शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

इर्विनमध्ये स्वाईन फ्लूचे १८ पॉझिटिव्ह

By admin | Updated: March 22, 2015 01:22 IST

राज्यभरात स्वाईन फ्लूने तोंड काढले असताना इर्विन रुग्णालयात आतापर्यंत एकूण १८ पॉझिटीव्ह व ७७० संशयीत रुग्ण आढळून आलेत.

वैभव बाबरेकर अमरावतीराज्यभरात स्वाईन फ्लूने तोंड काढले असताना इर्विन रुग्णालयात आतापर्यंत एकूण १८ पॉझिटीव्ह व ७७० संशयीत रुग्ण आढळून आलेत. रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने सर्व रुग्ण बरे होऊ शकलेत. स्वाईन फ्लूने इर्विनमध्ये एकही रुग्ण दगावला नाही. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून स्वाईन फ्लूचा प्रसार वाढल्याचे निदर्शनास आले होते. तेव्हापासून आरोग्य विभागाने विविध उपाययोजना सुरु केल्या होत्या. विविध माध्यमांतून जनजागृती करुन सर्व आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला होता. अमरावती जिल्ह्यातील सहा रुग्णांनी नागपूर येथील रुग्णालयांत प्राण सोडले. अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना वाचविण्यात इर्विन प्रशासनाला यश आले. इर्विनमध्ये आतापर्यंत सर्दी, खोकला व ताप अशा लक्षणांच्या २ हजार ११६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ७७० रुग्णांवर टॅमी फ्लूचा उपचार करण्यात आला. ७५ रुग्णांच्या 'थ्रोट स्वॅब' नमुन्यांची नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आल्यावर त्यामध्ये १८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेत. तसेच १४९ रुग्णांना इर्विनमध्ये दाखल करवून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखभालीत उपचार करण्यात आले. या रुग्णांकडे आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रीत करुन उपाय योजना केल्यात. बराचश्या रुग्णांचे आजार पूर्णपणे बरे झाले आहेत. इलाज सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती प्रकृती धोक्याबाहेर आहे.