शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

भाईचंद हिराचंद पतसंस्थेची चौकशी

By admin | Updated: September 29, 2014 00:32 IST

शेकडो गुंतवणूकदार आपली जमा रक्कम परत घेण्यास स्थानिक पानअटाई भागातील भाईचंद हिराचंद पतसंस्थेत दोन महिन्यांपासून पायपीट करीत आहेत. पण पतसंस्थेच्या कार्यालयाला

पतसंस्थेला टाळे : गुंतवणूकदारांची फसवणुकीची तक्रारअंजनगाव सुर्जी : शेकडो गुंतवणूकदार आपली जमा रक्कम परत घेण्यास स्थानिक पानअटाई भागातील भाईचंद हिराचंद पतसंस्थेत दोन महिन्यांपासून पायपीट करीत आहेत. पण पतसंस्थेच्या कार्यालयाला लागलेले टाळे उघडले नाही. हताश झालेल्या काही ठेवीदारांनी अखेर स्थानिक पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. तक्रार करणाऱ्यांमध्ये नगरसेवक नीलेश पसारी, उज्ज्वला टांक, गजानन चांदूरकर, राजेन्द्र झाडे, उमेश भोंडे, दीपक शेजे, मारोती पायघन, महादेव भावे, रघुनाथ आरोकार, सोनाली डिके आदींचा समावेश आहे. ठेवीदारांनी केलेली ही तक्रार सध्या पोलीस चौकशीत असून याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पण तक्रारीचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी या पतसंस्थेचे स्थानिक व्यवस्थापक राहुल कडू यांची पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी पतसंस्थेच्या कार्यालयाची झडती घेऊन महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. यासंदर्भाचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आला. मात्र पतसंस्थेच्या कार्यालयात ठेवीदारांचा एक रुपयादेखील सापडला नाही. सर्व रक्कम सुर्जीच्या आके बँकेमार्फत जळगाव येथील पतसंस्थेच्या कार्यालयात पाठविण्यात आल्याचे समजते.गुंतवणूकदारांनी पोलीस तक्रारीत नमूद केल्यानुसार पतसंस्थेच्या संचालकांनी उद्घाटनाच्या दिवशी गावात फिरुन रक्कम गोळा केली. मात्र ज्यावेळी ठेवीदारांना गरज पडली त्यावेळी रक्कम परत करण्यास संचालक असमर्थ ठरले. पतसंस्थेत कोणत्याच कर्मचाऱ्यांकडे अधिकृत नियुक्ती पत्र नसल्याची गंभीर बाबही तपासात पुढे आली. अंजनगावात बंद पडलेल्या या पतसंस्थेचे जळगाव येथील कार्यालय मात्र एखाद्या कार्पोरेट कंपनी कार्यालयालाही लाजवेल एवढे आलिशान आहे. ठाणेदार गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण हे या प्रकरणाची तपासणी करीत आहेत. जे संचालक मंडळ पतसंस्थेने नियुक्त केले होते त्यामधील बहुतांश संचालकांनादेखील गुंतवणुकीत आर्थिक फटका बसला. या सर्वांना प्रवृत्त करणारा आणि अंजनगावात पतसंस्था स्थापन करणाऱ्या मध्यस्थींचाही शोध सुरू आहे.