शहरातील अनधिकृत मालमत्तांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST2021-02-05T05:30:42+5:302021-02-05T05:30:42+5:30

अमरावती : शहरातील अनधिकृत मालमत्तांची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष धीरज श्रीवास यांनी ...

Investigate unauthorized properties in the city | शहरातील अनधिकृत मालमत्तांची चौकशी करा

शहरातील अनधिकृत मालमत्तांची चौकशी करा

अमरावती : शहरातील अनधिकृत मालमत्तांची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष धीरज श्रीवास यांनी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे केली. मागणीचे निवेदन बुधवारी आयुक्तांना सादर केले.

राजापेठ येथील श्रीराम मंदिर ट्रस्टचे नावे दीपार्चन हॉल आहे. या ट्रस्टचे चेंज रिपोर्ट व ऑडिट रिपोर्ट धर्मादाय आयुक्तांकडे सादर केलेला नसल्याचा आरोप श्रीवास यांनी निवेदनाद्वारे केला. याच ट्रस्टचा हॉल व परिसराचे भाडे नियमितपणे वसूूल केले जात असताना महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचे श्रीवास यांनी म्हटले आहे. याशिवाय दुकान व मॉलचा नकाशा मंजूर नाही. पार्किंगदेखील नाही. तखतमल इस्टेटदेखील या ट्रस्टची जागा आहे. या इमारतीला महापालिकेची परवाननगी नाही तसेच फायर ऑडिटदेखील नसल्याचा आरोप श्रीवास यांनी निवेदनात केला व कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली,

-----------------------------------------------

Web Title: Investigate unauthorized properties in the city