शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

अमरावती : ऑटो चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पोलिसांनी या प्रकरणी टोळीतील दोन आरोपींना ...

अमरावती : ऑटो चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पोलिसांनी या प्रकरणी टोळीतील दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई ४ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती.

उबेद खान वल्द वहिद खान (२३, रा. नायगाव अकोट फैल, अकोला) याला पोलिसांनी अकोला येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपी मोहम्मद मुदस्सीर युनुस (रा. तारफैल, अकोला) याच्यासोबत ऑटो चोरीचा गुन्हा केल्याची आरोपीने कबुली दिली. मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद युनुस यास न्यायालयातून प्रोडक्शन वाॅरंट घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली. तो मध्यवर्ती कारागृहात होता.

२० जून २०२० रोजी फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील अप क्रमांक ५७४/२०२० कलम ३३७ अन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपीला अटक केली.

आरोेपीने फ्रेजरपुरा हद्दीतील गुन्ह्यातील एक लाख रुपये किमतीचा ऑटो जप्त केला तसेच सदर आरोपीकडून वलगाव हद्दीतून ५० हजार रुपये किमतीचा ऑटो, राजापेठ हद्दीतून दीड लाखाचा ऑटो याव्यतिरिक्त चार लाख रुपये किमतीचे आणखीन दोन ऑटो तसेच एक लाखाची महागडी दुचाकी असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदर आरोपीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर यांच्या नेतृत्वात एपीआय जे.एन. सय्यद, पोलीस हवालदार प्रकाश जगताप, दीपक दुबे, सय्यद इम्रान, फिरोज खान, मोहम्मद सुलतान, चेतन कराळे, चालक अमोल बहाद्दरपुरे आदींच्या पथकाने केली. आरोपीकडून आणखीने गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.