शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मद्य, पैसा वाटपावर आयोगाची सूक्ष्मदृष्टी

By admin | Updated: October 5, 2014 22:57 IST

विधानसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्षांद्वारे होणाऱ्या गैरप्रकारावर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष आहे. उमेदवार व समर्थकांद्वारा होणारी मद्याची बेकायदा वाहतूक, मद्याचे व पैशांचे वाटप

अमरावती : विधानसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्षांद्वारे होणाऱ्या गैरप्रकारावर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष आहे. उमेदवार व समर्थकांद्वारा होणारी मद्याची बेकायदा वाहतूक, मद्याचे व पैशांचे वाटप रोखण्यासाठी आयोगाचे पथक तैनात आहेत.मद्य व पैसे वाटपाला आळा बसविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अमरावती-मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदी केली आहे. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलिसांच्या सहकार्याने प्रशासनाने उमेदवार व राजकीय पक्षांची हवा ‘टाईट’ केली आहे. प्रत्येक निवडणुकीत मद्य व पैशांचे वाटप केले जाते व अशा प्रकारांत कारवाईदेखील केली आहे. तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत जिल्हा सीमेवर तपासणीदरम्यान वाहनात जवळपास २ कोटी रुपये आढळून आले होते. या निवडणुकीत आतापर्यंत २५ लाख रुपये पकडण्यात आले आहेत. या सर्व प्रकारामुळे जिल्ह्याची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस दारुबंदी, उत्पादन शुल्क, आयकर विक्रीकर आदी विभागांचे कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या मदतीने या निवडणुकीत गैरप्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यासाठी विविध पथकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भौगोलिकदृष्ट्या विचार करुन किमान ४ ते ५ पथकांचा ‘वॉच’ राहणार आहे.निवडणूक काळात अमरावती-मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदी सुरु आहे. या ठिकाणी तैनात ‘स्थिर सर्वेक्षण पथका’द्वारे प्रत्येक खासगी वाहनांची कसून तपासणी सुरू आहे.