शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन तलाव दुरूस्ती कामांची होणार चौकशी

By admin | Updated: June 25, 2015 00:16 IST

जिल्हा परिषद सिंचन विभागअंतर्गत येणाऱ्या वरूड उपविभागात करण्यात आलेल्या सिंचन तलाव दुरूस्ती कामात अनियमितता झाली आहे.

अमरावती: जिल्हा परिषद सिंचन विभागअंतर्गत येणाऱ्या वरूड उपविभागात करण्यात आलेल्या सिंचन तलाव दुरूस्ती कामात अनियमितता झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या वरूड उपविभाग अंतर्गत करण्यात आलेल्या तालुक्यातील तीन गावात करण्यात आलेल्या सिंचन तलाव दुरूस्तीत मोठी अनियमीतता झाली असल्याची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य विक्रम ठाकरे सभापती गिरीष कराळे विजय श्रीराव व इतर काही पदाधिकाऱ्यांनी केली होती. या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत वरूड तालुक्यातील पिंपळखुटा, झोलंबा, आसोना येथील सिंचन तलाव दुरूस्तीचे कामात चुकीचे कामे दर्शवून देयके काढण्यात आली आहेत. यामध्ये पिंपळखुटा येथील तलाव दुरूस्तीच्या कामांसाठी सुमारे २१ लाख ८९ हजार मंजूर करण्यात आले होते. या कामांची निविदा काढतांना ७.८९ कमी दरात सदर काम १६ लाख ४७ हजार ४८ रूपये खर्च करण्यात आले आहे. मात्र दुरूस्तीचे कामे करताना लागणारे काही साहित्य तलावापासून शंभर मिटर अंतरावरून साहित्य वाहनाने आणले असतांना देयके काढतांना मात्र मटेरियल आणण्याचे ठिकाण चक्क दहा किलोमिटर दाखवून रक्कम काढण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. याची दखल घेत या विषयावर सभेत चर्चाकरून सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिक्षक अभियंता यांच्याकडे प्रस्ताव सादर करून समिती नियुक्त करण्याचा आदेश पिठासन सभापती सतीश उईके यांनी दिले आहेत. यावेळी इतरही प्रश्नावर चर्चा करण्यात आली सभेला अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीष कराळे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, सदस्या सदाशिव खडके ज्योती आरेकर, अरूणा गावंडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जे.एन आभाळे, कार्यकारी अभियंता पी.पी. पोटफोडे, उपअभियंता संजय येवले , सिंचन व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.