शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवानगी निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची चौकशी

By admin | Updated: October 15, 2015 00:11 IST

सध्या जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वारे वेगात वाहात आहेत.

शिक्षक बँक निवडणूक : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठरावअमरावती : सध्या जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वारे वेगात वाहात आहेत. मात्र, ही निवडणूक लढविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांनी निवडणूक लढविण्यासाठी संबंधित खाते प्रमुखांची पूर्वपरवानगी घेतली किंवा नाही, याची चौकशी करण्याचा निर्णय बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या निर्णयामुळे उमेदवारांच्या मागे नवा ससेमिरा सुरू होणार आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह, आरोग्य, सामान्य प्रशासन अशा विविध विभागात कार्यरत कर्मचारी शिक्षक बँकेच्या निवडणुकीत उतरले आहेत. यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिक्षकच आहेत. परंतु या सर्व उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह ते कार्यरत असलेल्या विभाग प्रमुखांची निवडणूक लढविण्यासाठी पूर्वपरवानगी घेतलेली नाही. शिवाय सुटीचे अर्ज टाकून उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. सोबतच अनेक शिक्षक शाळेला दांडी मारून प्रचारात मग्न आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सर्वसाधारण सभेत सदस्य सुधीर सूर्यवंशी यांनी केली आहे. याच मुद्यावर मोहन सिंघवी, अभिजित ढेपे, श्रीपाल पाल व अन्य सदस्यांनी आक्षेप घेतला नोंदविला . दांडी बहाद्दरांवरही कारवाईचा बडगाअमरावती : बहुतांश शिक्षकांसह काही कर्मचारी मूळ कामकाज बाजूला ठेऊन विना परवानगी प्रचार करीत असल्याचे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी पूर्णत: वाऱ्यावर आहेत. यावर कुणाचे नियंत्रण आहे किंवा नाही? असा प्रश्न जिल्हा परिषदेतील अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना सदस्यांनी विचारला. त्यामुळे काही वेळ अधिकारी स्तब्ध झाले होते. शिक्षण विभागाच्या इतरही विषयांवर वादळ उठल्याने सभागृहाचे वातावरण बरेच तापले होते. अखेर शिक्षक बँकेच्या निवडणूक रिंंगणात जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील जे कर्मचारी उतरले आहेत, त्या सर्वानी निवडणूक लढविण्यासाठी परवानगी घेतली किंवा नाही? याची सविस्तर चौकशी केली जाणार आहे. यासोबतच शिक्षक बँक निवडणुकीत उमेदवारासोबत बरेच शिक्षक विना परवानगी प्रचारात फिरत आहेत. अशांवर देखील कारवाई केली जाणार आहे. यासाठी आकस्मिक भेटी देऊन तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना सदस्यांच्या मागणीवरून अध्यक्षांनी दिले आहेत. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी बारकावे तपासून तसा अहवाल सादर करण्याची सूचना मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी दिल्या आहेत. सभेला अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, रविंद्र मुंदे, अभिजित ढेपे, प्रताप अभ्यंकर, सदाशिव खडके, महेंद्रसिंग गैलवार, बापूराव गायकवाड आदी सदस्यांसह पंचायत समिती सभापती विनोद टेकाडे, आशिष धर्माळे आदी उपस्थित होते.