शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

भारत महासत्ता होणार!

By admin | Updated: October 15, 2016 03:36 IST

सध्याचे २१वे शतक हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या शतकातच सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारी संस्कृती उदयास येणार असून

अमरावती : सध्याचे २१वे शतक हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या शतकातच सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारी संस्कृती उदयास येणार असून ‘विश्वबंधुभाव’ हा भारताच्या संस्कृतीचा पाया असल्याने भारत जगातील महासत्ता म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन परम संगणकाचे जनक विजय भटकर यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी चिंतन कार्यक्रमातून विजय भटकर संबोधित करीत होते. ते म्हणाले, सुपर कॉम्प्युटर क्षणात गणिताच्या कोट्यवधी किचकट प्रक्रिया करतो. असेच कार्य राष्ट्रसंतांच्या सामुदायिक ध्यान व प्रार्थनेतून होते. जगात १० हजार वर्षांत अनेक संस्कृती उदयास आल्या व लोपदेखील पावल्या. परंतु भारतीय संस्कृती अद्याप जिवंत आहे. आम्ही त्याचे वारसदार आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे.चिंतन कार्यक्रमापूर्वी भटकर यांच्या हस्ते राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे पूजन करण्यात आले. सामुदायिक ध्यानानंतर राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची शोभायात्रा व मानवसेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांचा टाळ पदन्यास, लेझीम व दिंडी काढण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रसंतांची खंजेरी भजने होतात. या सर्वांचा एकत्रित मेळ घालण्याकरिता या महोत्सवात शनिवारी खंजेरी भजन संमेलन दोन दिवस व दोन सत्रांत आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय सकाळी सामुदायिक ध्यान, चिंतन, योगासन व प्राणायाम, ग्रामगीता प्रवचन, सामुदायिक प्रार्थना, कीर्तन आदी कार्यक्रमही होतील. (प्रतिनिधी)