महिलांसाठी स्वतंत्र कोविड-१९ रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:55+5:30

कोरोना संसर्गावर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. इर्विन, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार केला जात आहे. कोविड-१९ हॉस्पिटलमध्ये पुरुष, महिलांवर एकत्र उपचार सुरू आहेत. मात्र, पॉझिटिव्ह गरोदर मातांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेची दमछाक होते.

Independent Kovid-19 Hospital for Women | महिलांसाठी स्वतंत्र कोविड-१९ रुग्णालय

महिलांसाठी स्वतंत्र कोविड-१९ रुग्णालय

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : २१ गर्भवती पॉझिटिव्ह, १५ महिलांची प्रसूती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात संक्रमित गरोदर महिलांवर उपचार करणे कठीण होत आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परिसरातच महिलांसाठी स्वतंत्र कोविड-१९ हॉस्पिटल उभारले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी येथे दिली.
कोरोना संसर्गावर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. इर्विन, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार केला जात आहे. कोविड-१९ हॉस्पिटलमध्ये पुरुष, महिलांवर एकत्र उपचार सुरू आहेत. मात्र, पॉझिटिव्ह गरोदर मातांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेची दमछाक होते. त्यामुळे आता महिलांसाठी स्वतंत्र कोविड-१९ रुग्णालय उभारले जाणार आहे. या रुग्णालयात आॅक्सिजन, व्हेंटिलेटरसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिकांचा समावेश असणार आहे. ७० ते ८० बेडचे हे रुग्णालय असेल. हल्ली कोरोना संक्रमित गरोदर मातांना डफरीन, कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत २१ गरोदर मातांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी १५ प्रसूती झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. कोरोना पॉझिटिव्ह महिला व नवजातांना जपणे आवश्यक असल्याने प्रशासनाने यासाठी स्वतंत्र कोविड-१९ रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतल्याची पुष्टी जिल्हाधिकारी नवाल यांनी दिली.

१८० पेक्षा जास्त होम आयसोलेटेड
अमरावती शहरात १८० पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण होम आयसोलेटेड आहेत. मोझरी, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर येथे संक्रमित आढळून येत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांना अमरावतीत उपचारासाठी आणले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवाल यांनी दिली. चांदूर रेल्वे, अमरावतीत प्राईम पार्क व एक अशी तीन रुग्णालये तयार होत आहेत. येथे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी परवानगी देण्यात आली.

सारीचे तीन वॉर्ड
इर्विन रुग्णालयात सारी रुग्णांच्या उपचारासाठी ९, १० व ११ असे तीन स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात आले आहेत. येथे आॅक्सिजन, व्हेंटिलेटर व अन्य सुविधा आहेत. हल्ली इर्विनमध्ये सॉरीचे २६, तर पीडीएमसीत १३ रुग्ण आहेत.

Web Title: Independent Kovid-19 Hospital for Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.