शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

मार्चमध्येच पारा चाळिशी पार, 'या' तीन जिल्ह्यांना दोन दिवस 'हीट वेव्ह'चा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 19:11 IST

Amravati : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्रता वाढली आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या दिशाबदलांसह कोरड्या हवामानामुळे विदर्भातील तापमानात मोठी वाढ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
मार्च महिन्याच्या प्रारंभापासूनच उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. दिवसाचा पारा चाळिशी पार गेला आहे. अशातच प्रादेशिक हवामान केंद्राने अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांसाठी रविवार व सोमवारी 'हिट वेव्ह' म्हणजेच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारा करण्यात आले आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्रता वाढली आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या दिशाबदलांसह कोरड्या हवामानामुळे विदर्भातील तापमानात मोठी वाढ होत आहे. विशेषतः पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट तीव्र राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्याचे कमाल तापमान तीन दिवसांपासून ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. शिवाय रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे.

दुपारच्या वेळी फिरणे टाळा, आवाहन

बाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा. चहा, कॉफी आणि मद्यपान टाळा आणि फिकट रंगाचे कपडे वापरा व भर उन्हात जड शारीरिक कष्टाची कामे करू नका, असे आवाहन आरोग्य विभागाद्वारा करण्यात आले आहे. तापमानवाढ होणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आहे.

उष्माघाताची लक्षणे ओळखा

तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ होणे किंवा प्रचंड घाम येणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच संबंधित व्यक्तीला तातडीने सावलीत न्यावे, शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पशुधनाची घ्यावी काळजी

  • वाढत्या तापमानाचा फटका १ केवळ माणसांनाच नाही, तर जनावरांनाही बसत आहे. दुभत्या जनावरांना शक्यतो सावलीत बांधावे आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय कायम ठेवावी.
  • पिकांना शक्य असल्यास रात्री किंवा पहाटे पाणी द्यावे, जेणेकरून बाष्पीभवन कमी होईल. दरम्यान शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची मळणी होत आहे. मात्र ही कामे यांत्रिकीकरणाद्वारे करण्यावर शेतकऱ्यांचा कल आहे. याशिवाय शेतांमधील मशागतीची कामे
English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra: Heatwave Alert for Akola, Amravati, Wardha as Temperatures Soar

Web Summary : Akola, Amravati, and Wardha face a heatwave alert with temperatures exceeding 40°C. Residents are urged to take precautions: stay hydrated, avoid midday sun, wear light clothing, and recognize heatstroke symptoms. Farmers should provide shade and water for livestock and irrigate crops at night.
टॅग्स :Heat Strokeउष्माघातVidarbhaविदर्भAkolaअकोलाAmravatiअमरावतीnagpurनागपूरSummer Specialसमर स्पेशल