शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाचा ठरतोय ‘जात’ फॅक्टर!

By admin | Updated: October 12, 2015 00:44 IST

७ नोव्हेंबरला होणाऱ्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीत जाती-पातीचे राजकारण शिरले आहे.

अमरावती : ७ नोव्हेंबरला होणाऱ्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीत जाती-पातीचे राजकारण शिरले आहे. केवळ शिक्षक किंवा जि.प. कर्मचारी म्हणून नव्हे, तर जातीच्या नावावर प्रचाराचे घोडे दामटले जातेय. विरोधी पॅनेलने आपल्या जातीला कसे डावलले, विशिष्ट जातीच्या उमेदवारांना कसे प्राधान्य दिले, हे पटवून दिले जात आहे. शिक्षक मतदारसंघाच्या तुलनेत जि.प. कर्मचारी संवर्ग मतदारसंघात ‘जात’ दाखवून अवलक्षण होत आहे. २१ संचालकांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्हाभरातील १० हजारांवर शिक्षक आणि २ हजारांपेक्षा अधिक जि.प. कर्मचारी सरसावले आहेत. यात अनुसूचित जाती-जमातींसह विविध संवर्गासाठी जागा राखीव आहेत. मात्र, त्याचवेळी २१ पैकी एकाही जागेवर आपल्या उमेदवाराला प्राधान्य दिले नाही, असा प्रचार करून प्रतिस्पर्धी पॅनेलच्या उमेदवारांची विकेट घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि अकोला असे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक यंदा प्रथमच विभागीय स्तरावर होत असल्याने ही लढत रंगतदार होणार आहे. यंदा प्रथमच समता, प्रगती, युवाशक्ती आणि परिवर्तन पॅनेलमध्ये काट्याच्या लढतीची चिन्हे आहेत. २१ संचालकांसाठी १७२ पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक आता ‘जाती’वर उतरल्याचे दिसून येते. तालुकास्तरावर प्रचार करणाऱ्या उमेदवारांना विभागस्तरावर प्रचार करताना प्रचाराचे वेगवेगळे मुद्दे शोधावे लागत आहेत. बँकेच्या विकासाबाबत बोलताना जातीबद्दलही सांगितले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा परिषद कर्मचारी संवर्ग मतदारसंघात हा प्रकार होत आहे. राजकारणातील जाती-पातीचे राजकारण यंदा प्रथमच सहकार क्षेत्रातील निवडणुकीतही पहावयास मिळत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षक नेते, उमेदवार परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असून राजकारण्यांनाही लाजवेल, असा शिक्षकांचा प्रचाराचा थाट वाढलेला दिसत आहे. शिक्षकांसोबतच जिल्हा परिषदेचे कर्मचारी प्रचारात उतरले आहेत. उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत कागदोपत्रीच दिसणाऱ्या अनेक संघटना पॅनेलच्या प्रसिध्दी पत्रकावर येऊन स्वत:चा भाव वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. (प्रतिनिधी)