शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

- तर आपले येणे अनमोल ठरेल...

By admin | Updated: November 4, 2014 22:31 IST

राज्याचे पालक अर्थात राज्यपाल सी. विद्यासागर राव आज अमरावती जिल्ह्यात येत आहेत. ज्या अंबानगरीबाबत 'वैभवसंपन्न प्रांत' असा उल्लेख महाभारतकाळातील ग्रंथांतही आढळतो, ती विदर्भाची सांस्कृतिक

निमित्त राज्यपालांच्या आगमनाचेगणेश देशमुख - अमरावतीराज्याचे पालक अर्थात राज्यपाल सी. विद्यासागर राव आज अमरावती जिल्ह्यात येत आहेत. ज्या अंबानगरीबाबत 'वैभवसंपन्न प्रांत' असा उल्लेख महाभारतकाळातील ग्रंथांतही आढळतो, ती विदर्भाची सांस्कृतिक राजधानी महामहिमांच्या आगमनप्रतीक्षेने शहारली आहे. कुटुंबाचा पसारा राज्यभर पसरलेला असताना लोकशाहीतील आमचे हे पालक आमच्या भेटीला आमच्या गावात येताहेत, ही अनुभूती आनंदाच्या उकळ्या आणणारी आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित 'इंद्रधनुष्य २०१४' या दर्जेदार राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्ताने येणारे राज्यपाल विद्यापीठातून उसंत मिळाली की, लगेच धारणीत पोहोचणार आहेत. जंगलांमध्ये राहणाऱ्या, पोटापुरते कमविणाऱ्या, जणू वेगळ्या ग्रहावरील जीव भासावे अशा जीवनशैलीच्या आमच्याच समाजघटकांची ते आस्थेने चौकशी करणार आहेत. कुटुंबातील एक धीट मुलगा भराभर शिकून विदेशातील चमकदार दुनियेत रमावा आणि ओशाळणारा दुसरा गावातच राहून परंपारागत कार्यात मग्न व्हावा, तरीही दोघांमध्ये मायबापांचा सारखाच जीव असावा, अशीच काहीशी भूमिका राज्यपालांच्या नियोजित कार्यक्रमातून व्यक्त होत आहे. वनसंपदेने नटलेले मेळघाट जगाच्या नकाशावर आले तेच मुळी कुपोषणामुळे. कुपोषण घालविण्यासाठी शासनाने पैशांचा पूर वाहवला. त्याचा निर्णायक परिणाम मात्र आजतागायत जाणवला नाही. हा निधी नेमका खर्च होतो तरी कुठे, असा प्रश्न आजही निर्माण होतोच. राज्यातल्या अनेक शहरांत केवळ छंद म्हणून पाळल्या जाणाऱ्या श्वानांच्या उपचारांसाठी अद्ययावत इस्पितळे आहेत. श्वानांची फॅशनेबल वस्त्रे विकणारी दुकाने आहेत. मानवाची प्रगती आणि भूतदयेबाबतची त्याची तरल संवेदना व्यक्त करणारे हे चित्र ज्या राज्यात अस्तित्वात आहे, त्याच महाराष्ट्रातील मेळघाट प्रांतात आजही अन्नावाचून चिमुकल्यांचे अन् उपचाराविना मातांचे जीव जातात, रोजगाराच्या शोधात शहरात येऊन गुलामासमान राबणारी ही आदिवासी मंडळी याच महाराष्ट्राची रहिवासी आहेत ना, असा प्रश्न मनाला भेदून जातो. राज्यपाल महोदय, आपण येताहात. आपले अधिकारी ठराविक ठिकाणी आपणाला नेतील. कदाचित आपल्यासमेर आधीच 'पढविलेले' आदिवासी हजर करतील. 'बडे साहब आ रहे है' हे त्याला आधीच बजावून ठेवण्यात आलेले असेल. आता अशा 'बड्या साहेबां'च्या भेटींचा आणि त्यांच्यासमोर नेमके काय बोलावे लागते, याचा आदिवासींनाही सराव झाला आहे. प्रशासनाची ही नेहमीची पद्धती अमरावती जिल्ह््यालाही अंगवळणी पडली आहे. आमचा राग त्यांच्यावर नाहीच. आहे ती आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची तळमळ. राज्यपाल महोदय, एक विनंती आहे. 'प्रोटोकॉल'ची बंधने झुगारून करता आले तर बघा. अनपेक्षितपणे आपण आदिवासींच्या एखाद्या खेड्याला भेट द्या. आदिवासींशी थेट भेट होऊ द्या. या भेटीतून आपल्याला खरा आदिवासी कळेल. त्याच्या नेमक्या समस्या कळतील. नेमका उपाय योजण्यासाठी ही भेट नाडीपरीक्षणाचे कार्य करेल. केवळ प्रशासनच नव्हे, आदिवासींच्या जीवावर जगणारे अनेक घटक मेळघाटात कार्यरत आहेत. सामाजिक संस्थांचा सुळसुळाट आहे. आदिवासींनी 'आहे तसेच' राहिले तरच या घटकांचे दुकान चालणार आहे. प्रशासनाकडून एक भीषण वास्तव सोयीस्करपणे लपविले जात आहे. नैसर्गिक सानिध्यात राहणाऱ्या काटक अन् निकोप आदिवासींमध्ये चिंताजनक लैंगिक आजारांचे प्रमाण अचानकपणे वाढू लागले आहे. पुरेसे सजग नसलेल्या आदिवासींच्या प्रजातीसाठी भविष्यातील महाप्रलयाचेच हे संकेत आहेत. आदिवासींना मायानगरीची स्वप्ने दाखविणारी अन् त्यांच्या स्वप्नातील शहराची सैर घडवून आणणारी मंडळी आता मेळघाटात पाय रोवू लागली आहे. या विषयाच्या तळाशी जाऊन ३१० गावांतील तीन लक्ष आदिवासींचे नैसर्गिक अस्तित्त्व अबाधित राखता आले तर महामहिम महोदय, आपले येणे ही मेळघाटला मिळालेली अनमोल भेट ठरेल!