'या' कंपनीचे ईव्ही घ्याल तर वाहन जाईल भंगारात ; सव्हिंसिंग सेन्टरचा झाला बट्ट्याबोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:31 IST2025-11-21T17:29:42+5:302025-11-21T17:31:11+5:30

Amravati : वाहनधारक त्रस्त, तक्रार करायची कोणाकडे?, शेकडो वाहने भंगारात

If you buy an EV from this company, your vehicle will end up in a scrapyard; The servicing center has gone bankrupt | 'या' कंपनीचे ईव्ही घ्याल तर वाहन जाईल भंगारात ; सव्हिंसिंग सेन्टरचा झाला बट्ट्याबोळ

If you buy an EV from this company, your vehicle will end up in a scrapyard; The servicing center has gone bankrupt

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
इंधन महागडे असल्यामुळे नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक्स वाहनांना पसंती देत ही वाहने खरेदीकडे कल वाढला आहे. मात्र ओला कंपनीच्या वाहनांना वर्ष, दोन वर्षात या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड आला असून ऑनलाइन सर्व्हिसिंगचा बट्ट्याबोळ झाला आहे. सर्व्हिसिंग केंद्राच्या परिसरात ओलाची शेकडो वाहने भंगारात पडून असून दुरुस्ती होण्याचा पत्ता नाही. या केंद्रावरून वाहनधारकांना योग्य उत्तर मिळत नाही. लाख, दीड लाखांचे हे वाहन खरेदी करूनसुद्धा दुरुस्तीसाठी येरझारा माराव्या लागत आहेत.

ओला ईव्ही वाहनाची मार्केटिंग करताना कंपनीने मोठमोठे आमिष दाखविले होते. 'सब कुछ ऑनलाइन' असे म्हणत ग्राहकांना भुरळ पाडली. हे इलेक्ट्रिक वाहन हे बाहेरून देखणे आणि वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असल्याने अनेकांनी ते ऑनलाइन खरेदी केल्यात. मात्र वर्ष, दीड वर्षातच अनेकांना ओला ईव्ही वाहनांचे वास्तव जाणवू लागले आहे. चार्जर कनेक्शन पॉइंटमध्ये दोष असल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. २ ते ६ महिन्यांपासून अनेक वाहने ही सर्व्हिसिंग केंद्राच्या बाहेरच बेवारस पडून आहे. ही वाहने दुरुस्त करणारे मॅकेनिकल बाजारात उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना कंपनीच्या सर्व्हिसिंग केंद्राशिवाय पर्याय नाही, हे वास्तव आहे. अशी स्थिती राज्यभरात असून, ओला वाहनांची समस्या सोडविणे ही काळाची गरज ठरू लागली आहे. 

सव्हिंसिंग सेंटरही अडगळीच्या ठिकाणी

ओला ईव्ही वाहने म्हणजे नाव मोठे दर्शन खोटे असाच काहीसा कारभार सुरू आहे. या वाहनात बिघाड आल्यास ते सर्व्हिसिंग सेंटरसुद्धा अडगळीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे ओला वाहन नादुरुस्त झाल्यास इतर वाहनात टाकूनच सर्व्हिसिंग सेंटरला आणावे लागते. गोपाल नगर ते सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मार्गावर एका भाड्याचा घरात हे सर्व्हिसिंग सेंटर सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करून हे सेंटर गाठावे लागते. गत १५ दिवसांपासून सव्हिसिंग सेंटर बंद होते. आता २० नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. या संदर्भात अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत.

शासन, प्रशासन लक्ष देईल का?

ओला वाहनात नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहेत. याबाबत वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकरणी शासन, प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.

"आम्ही तीन वर्षांपूर्वी ओला वाहन खरेदी केले. वर्षभरात वाहनात बिघाड आला. बॅटरीदेखील डाऊन झाली. ३ महिने सेंटरमध्ये ही गाडी ठेवण्यात आली. त्यानंतर ती दुरुस्त झाली."
- माया बांबोडे, अमरावती.

Web Title : ओला ईवी खरीद: वाहन बन सकता है कबाड़; सर्विस सेंटर विफल

Web Summary : अमरावती में ओला ईवी मालिकों को बड़ी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। दो साल के भीतर वाहन खराब हो रहे हैं, ऑनलाइन सर्विसिंग विफल हो रही है। सैकड़ों वाहन सर्विस सेंटरों पर लावारिस पड़े हैं, मरम्मत अनिश्चित है, जिससे मालिकों में निराशा है।

Web Title : Ola EV Purchase: Vehicle May End Up Scrap; Service Center Failure

Web Summary : Ola EV owners in Amravati face major issues. Vehicles malfunction within two years, online servicing is failing. Hundreds of vehicles are abandoned at service centers, with repairs uncertain, causing frustration for owners.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.