नवऱ्याला छायाचित्र पाठवून बदनामी करेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST2021-07-16T04:11:16+5:302021-07-16T04:11:16+5:30

अमरावती : पूर्वी मैत्रीचे संबध असलेल्या एका विवाहितेने आरोपीस भेटण्यास नकार दिला असता, तुझ्या नवऱ्याकडे गेली तर मी तुला ...

I will defame my husband by sending him a photograph | नवऱ्याला छायाचित्र पाठवून बदनामी करेन

नवऱ्याला छायाचित्र पाठवून बदनामी करेन

अमरावती : पूर्वी मैत्रीचे संबध असलेल्या एका विवाहितेने आरोपीस भेटण्यास नकार दिला असता, तुझ्या नवऱ्याकडे गेली तर मी तुला सोडणार नाही व तुझे नवऱ्याला छायाचित्र पाठवून बदनामी करेन, अशी फोनवर वारंवार धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील रविनगरात १ मे ते ९ जुलै दरम्यान घडली. याप्रकरणी २५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध राजापेठ पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदविला.

पोलीस सूत्रानुसार, मोहन खाडेकर ( रा. राजापेठ) असे आरोपीचे नाव आहे. महिलेशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. मात्र, लग्न झाले असल्याने तिने भेटण्यास व बोलण्यास नकार दिला. मात्र, आरोपीने दोघांची छायाचित्रे पतीला पाठविण्याची धमकी दिली तसेच तिला वारंवार कॉल करून तिचा पाठलाग केला. तिने त्याचा नंबर ब्लॉक केला असता, तो एवढ्यावरच थांबला नाही, तर पतीच्या मोबाईलवर कॉल करून मेसेज पाठवून तिची बदनामी केली. आरोपीला त्रस्त झालेल्या माहिलेने अखेर पोलिसांत धाव घेतली. आरोपीविरुद्ध भादविची कलम ३५४(ड),५००,५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: I will defame my husband by sending him a photograph