शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बाळा़़़परत ये मी वाट पाहते !

By admin | Updated: October 17, 2015 00:16 IST

मागील ३०० वर्षांपूर्वीचे जागृत स्थान व पंच शक्तीने नटलेल्या मंगरूळ दस्तगीर येथील मंगला देवीचे हे पुरातन मंदिर प्रसिध्द आहे़ बाळा परत ये मी वाट पाहते, ...

जागृत देवस्थान : मंगरुळ दस्तगीर येथील जागृत मंगला मातेचे पुरातन मंदिरधामणगाव रेल्वे : मागील ३०० वर्षांपूर्वीचे जागृत स्थान व पंच शक्तीने नटलेल्या मंगरूळ दस्तगीर येथील मंगला देवीचे हे पुरातन मंदिर प्रसिध्द आहे़ बाळा परत ये मी वाट पाहते, अशी हाक प्रत्येक भाविकाला देणारी मंगला माता म्हणून ओळखली जाते़तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथे तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन मंगला देवी मंदिर आहे़ या मंदिराविषयी वेगवेगळ्या आख्यायिका सांगण्यात येतात़ मागील साधरणत: तीनशे वर्षांपूर्वी येथील कोणी भक्त नवरात्रात माहूरला रेणुका मातेच्या दर्शनास जात होता़ पुढे वृध्दावस्थेमुळे जाऊ शकत नसल्याने तो फार दुखी झाला. रेणुकामाता म्हणाली 'तू चिंता करू नकोस, तुझ्या गावाला येते़ एक सदपुरूष यामार्गे जात असता त्याच्या नित्य पुजेतील रेणुकाआईचा तांदळा मुखवटा येथे मंगलधाम परिसरात राहिला पुढच्या मुक्कामी मुखवटा नसल्याचे लक्षात आल्यावर तो परत या भागात आला असता रेणुकाईने मी आता येथेच राहणार असल्याचे सांगितले़ तो प्रगटदिन चैत्र शुध्द चतुर्दशीचा होता. तेव्हापासून आजही चैत्र शु़१४ ला दरवर्षी कुळाचाराचा उत्सव होतो़ या मंगलामातेला भवानीमाता सुध्दा म्हणतात. हे स्थान माहूर क्षेत्राचे उपशक्तीपीठ असल्यामुळे माहूरच्या रेणुकाईचा केलेला नवस येथे फेडला जातो, अशी श्रध्दा आहे़या मंदिरात अनेक संतांनी भेटी दिल्यात रा़स्व़चे गोवलकर गुरूजी, शिलानंद सरस्वती, सोनईचे हिरहरानंदनाथ महाराज यांनी या मंदिरात येऊन मंगलादेवी मूर्तीचे दर्शन घेतले होते़ माहूरच्या प्रणिता नदीचे जल येथील विहिरीत असल्यामुळे ही विहीर प्रणितातिर्थ आहे़ या विहिरीतील जलाने स्रान केल्यास शारीरिक व मानसिक रोग नाहिसे होतात़ तसेच हे स्थान माहूरचे उपशक्तीपीठ असल्यामुळे माहूरला केलेला नवस येथे पूर्ण केला जातो, अशी परिसरातील भाविकांची श्रध्दा आहे़ मागील अनेक वर्षांपासून भाविकांची येथे गर्दी वाढली आहे़मंगरूळ दस्तगीरची मंगला माता अनेक घराण्यांची कुलदैवत आहे़ मध्यंतरी काही काळ हे स्थान दुर्लक्षित होते़ ई़स़१९४२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सर संघ चालक गोवलकर गुरूजी मंगरूळची संघ शाखा पाहण्याकरिता दैऱ्यावर आले होते़ पुढे नागपूरचे पूर्वाश्रमीचे खेळकर म्हणजे स्वामी शिलानंद स्वरस्वती हे सन्यास घेतल्यानंतर साधना करण्याकरिता मंगरूळला आले होते़ या मंदिराचा अधिक विकास व्हावा याकरिता एऩजी़ उपाख्य बाबुराव देशपांडे यांनीही अथक परिश्रम घेतले़ भाविकांच्या हाकेला पावणारी मंगलामाता म्हणून आजही प्रसिध्द आहे़ नवरात्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते़ मागील चार दिवसांपासून येथे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत़