शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विस्तार अधिकाऱ्यांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: November 18, 2015 00:29 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत चौदाही पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व तालुका समन्वयक यांचे दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही.

वेतन थकले : एनआरएलएम आंदोलनाच्या तयारीतअमरावती : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत चौदाही पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व तालुका समन्वयक यांचे दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत विस्तार अधिकारी व तालुका समन्वयक ग्रामीण भागात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे महिला बचत गटाचे काम असून महिला बचत गटाला प्रशिक्षण देणे, व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देणे व मार्गदर्शन करणे अशा विविध स्वरुपाची कामे आहेत. मागील वर्षापासून विस्तार अधिकारी (एनआरएलएम) व तालुका समन्वयक यांना नियमित वेतन मिळत नाही. याबाबत प्रकल्प संचालकांना अनेकदा निवेदन दिलीत. परंतु जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने याची कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे विस्तार अधिकारी व तालुका समन्वयक आर्थिक विवंचनेत असून कौटुंबिक गरजा सोडविण्यासाठी त्यांना अडचण जात आहे. गृहकर्जाचे, जीवन विमा व इतर कर्जांच्या हप्त्यावरील व्याजाचा बोजा वाढत आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत वेतन न मिळाल्यास २३ पासून सभाबंद व अहवालबंद आंदोलनाचा इशारा विभागीय संघटक सतीश खानंदे, संदीप देशमुख, प्रल्हाद तेलंग, सुधाकर उमक, मिलिंद ठुणुकले, विठ्ठल जाधव, प्रेमानंद मेश्राम, प्रवीण वानखडे, सुशील माडीवाले, सुधाकर भिवगडे, ईश्वर सातंगे, महादेव कासदेकर, सुनील गवई, अन्ना ठाकरे, अनिल फुटाने, अशोक बनसोड, मीना मसतकर, पी.बी. नान्हे, साळवे, भुयार, भांडे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)