शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 6:00 AM

सजावटीसाठी येणाºया कार मुख्य रस्त्यावर उभ्या केल्या जातात. कारचे सर्व पाचही दरवाजे उघडल्यामुळे एकाच कारसाठी मोठी जागा व्यापली जाते. अनेक कार एकाच वेळी उभ्या असताना अवघा परिसरच गिळंकृत होतो. कार सजावट करणारे कर्मचारी रस्त्यावर खुर्च्या ठेवून बसतात. मोठे फलक रस्त्यावर ठेवले जाते.

ठळक मुद्देकार सजावट व्यवसाय रस्त्यावर : पोलिसांचे बळ मात्र नियमबाह्य कामांना !

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागीय क्रीडा संकुल आणि परिसरात कार सजावटीची अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत. मोर्शी रोडचा वापर गृहीत धरूनच हे व्यवसाय या परिसरात सुरू करण्यात आलेत. त्यामुळे संकुल परिसरातील मुख्य रस्त्याचा अर्धाअधिक भाग कायम व्यापलेला असतो. या रस्त्यांवर अपघात ही नित्याचीच बाब ठरली आहे. नियमबाह्य व्यावसायिकांना बळ देणाऱ्या पोलिसांनी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे.सजावटीसाठी येणाऱ्या कार मुख्य रस्त्यावर उभ्या केल्या जातात. कारचे सर्व पाचही दरवाजे उघडल्यामुळे एकाच कारसाठी मोठी जागा व्यापली जाते. अनेक कार एकाच वेळी उभ्या असताना अवघा परिसरच गिळंकृत होतो. कार सजावट करणारे कर्मचारी रस्त्यावर खुर्च्या ठेवून बसतात. मोठे फलक रस्त्यावर ठेवले जाते. सजावटीदरम्यान कारमधील सीट काढून रस्त्यावर ठेवल्या जातात. कर्मचारी आणि कारसोबत आलेल्यांचा रस्त्यावरील वावर जणू पटांगणात फिरावे असाच असतो. दुकानांत येणाऱ्या बहुतांश कार विरुद्ध दिशेने आणल्या जातात. त्या तशाच ' राँग साइड' स्थितीत रस्त्यावर उभ्या ठेवून त्यांची सजावट केली जाते. कार मागे-पुढे करताना मुख्य रस्त्यावरील वर्दळीचे जराही भान ठेवले जात नाही. अत्यंत वर्दळीचा हा मुख्य रस्ता चक्क खासगी मालमत्तेप्रमाणे राजरोसपणे वापरला जातो. मोजक्या व्यावसायिकांच्या आर्थिक लाभासाठी शेकडो, हजारो नागरिकांचे जीव पोलीस धोक्यात घालत असल्याच्या भावनेने सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या मुख्य रस्त्यावर उड्डाणपुलावरील वाहने उतरत असल्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहनांना नेहमीच व्यापलेल्या रस्त्याचा अडथळा होतो. त्यामुळे अनेक अपघात घडतात. सदर परिसरात महाविद्यालये, क्रीडा संकुल असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा वावर असतो. त्यांनाही या स्थितीमुळे अपघातांचा सामना करावा लागतो.पोलिसांचीही वाहने सजावटीलाअपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यां कार सजावटीच्या नियमबाह्य मुद्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांची खासगी वाहने या दुकानांमध्ये सजावटीसाठी नेली जातात.अधिकारी कुणासाठी?सार्वजनिक उपयोगासाठी असलेल्या, वाहने चालविण्यासाठी असलेल्या रस्त्यांचा कुणी खुलेआम व्यावसायिक वापर करीत असेल, कायद्याला वाकुल्या दाखवित असेल तरीही पोलिस गप्प राहत असतील, महापालिका दुर्लक्ष करीत असेल आणि क्रीडा अधिकारी हात वर करीत असतील, तर हे अधिकारी कुणाचे? त्या नियमबाह्य व्यावसायिकांचे की सामान्यांचे? प्रशासनाचे कर्तव्य काय? नागरिकांचे संरक्षण की नियमबाह्य व्यावसायिकांचे रक्षण, असे प्रश्न सामान्यजनांना अस्वस्थ करतात.

टॅग्स :carकार