शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गयाठी नाल्याच्या पुरात ‘त्याचा’ मृत्यूशी संघर्ष

By admin | Updated: August 6, 2015 01:25 IST

जिल्ह्यात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने सर्व नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.

रात्रभर अनुभवला मृत्यूचा थरार : आॅटोरिक्षासह मोबाईल, २३ हजार रूपयेदेखील गेले वाहून संदीप मानकर  दर्यापूरजिल्ह्यात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने सर्व नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अमरावतीच्या मंडईत भाजीपाला विकून गावाकडे परतणाऱ्या दोन युवकांचे प्राण कसेबसे पुरातून वाचले. एक जण पुरातून बाहेर निघाला तर त्याचा सहकारी मात्र रात्रभर पुराच्या पाण्यात मृत्यूशी संघर्ष करीत राहिला. ही घटना दर्यापूर तालुक्यातील सांगळूदनजीकच्या गयाठी नाल्यात घडली. त्याने साक्षात मृत्यू अनुभवला.आकोट तालुक्यातील वडाळीसटवाई येथील रहिवासी बंडू सुखदेवराव पोहरे व अनवर खाँ हे दोघे मंगळवारी दुपारी १२.३० वाजता आकोटहून अमरावतीला आले. अमरावतीच्या मंडईत त्यांनी भाजीपाला आणला. त्यानंतर एमआयडीसीत गेले. तेथे त्यांनी जिनिंगसाठी लागणारे सुटे भाग खरेदी केले. सर्व साहित्य घेऊन ते रात्री गावाकडे निघाले. रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास सांगळूूदनजीकच्या गयाठी नाल्याला पूर आला होता. त्यांनी छोटी आॅटोरिक्षा एम.एच.३० एडी- १४४४ हा घेऊन पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. परंतु पुराच्या प्रवाहामुळे आॅटोरिक्षा अडकली. पाणी आॅटारिक्षात शिरताच अन्वरखाँ व बंडू पोहरे यांनी उड्या घेतल्या. परंतु बंडू पोहरे हा पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याने एका झाडाच्या फांदीला घट्ट धरून जीव वाचविला. याच अवस्थेत त्याला रात्र काढावी लागली. घटनेची माहिती उपविभागीय कार्यालयाला मिळताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु रात्री रेस्क्यू आॅपरेशन राबविता आले नाही. सकाळ होताच बंडू पोहरे यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. पोहरे यांचा मोबाईल व २३ हजार रुपयेसुध्दा पुरात वाहून गेले.