अंजनसिंगीत रखडले महामार्गाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST2021-09-02T04:28:09+5:302021-09-02T04:28:09+5:30

अंजनसिंगी : बाभूळगाव-अंजनसिंगी-रिद्धपूर राज्य महामार्ग क्रमांक ३०० चे गावातील काम रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या दोन्ही ...

Highway work stalled in Anjan Singh | अंजनसिंगीत रखडले महामार्गाचे काम

अंजनसिंगीत रखडले महामार्गाचे काम

अंजनसिंगी : बाभूळगाव-अंजनसिंगी-रिद्धपूर राज्य महामार्ग क्रमांक ३०० चे गावातील काम रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

महामार्गाच्या दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत ग्रामस्थांनी अतिक्रमण केले आहे. १८ मीटरचा हा रस्ता मंजूर झाला तरी प्रत्यक्ष तो कुठे १० मीटर, तर कुठे ११ मीटर रुंद आहे. त्या रस्त्यातील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. कंत्राटदाराने अतिक्रमण काढण्यासाठी अनेकदा संबंधित विभागाला माहिती दिली. परंतु, संबंधित विभागाने याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले. कंत्राटदाराने रस्त्याचे अर्धवट काम केली असल्यामुळे गावामध्ये पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटलेली आहे तसेच गावातील पथदिवेसुद्धा बंद आहेत. गावातील पाणीपुरवठा व पथदिव्यांची सुविधा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

310821\img_20210831_140450.jpg

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्ष पणामुळे अंजन्सिंगी तील रोडचे काम रखडले बातमी फोटो

Web Title: Highway work stalled in Anjan Singh