शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता विभागप्रमुख, कनिष्ठ लिपिक निलंबित

By admin | Updated: May 8, 2015 00:22 IST

महापालिकेचे स्वच्छता प्रमुख देवेंद्र गुल्हाने आणि क्रीडा विभागात कनिष्ठ लिपिकपदी कार्यरत प्रशांत पवार यांच्यावर गुरूवारी आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली.

अमरावती : महापालिकेचे स्वच्छता प्रमुख देवेंद्र गुल्हाने आणि क्रीडा विभागात कनिष्ठ लिपिकपदी कार्यरत प्रशांत पवार यांच्यावर गुरूवारी आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली. यापूर्वी सांस्कृतिक भवनात आर्थिक अपहार झाल्याप्रकरणी आठ जणांवर फौजदारी दाखल झाली होती. आता दोघांचे निलंबन केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.महापालिका दरवर्षी स्वच्छता विभागावर ३८ कोटी रुपये खर्च करते. मात्र, या तुलनेत शहराची सफाई योग्य प्रकारे होत नाही, हे वास्तव आहे. दैनंदिन सफाईच्या कंत्राटात प्रचंड अनियमितता असल्याचे आयुक्त गुडेवार यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्तांनी काही प्रभागात भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांची झाडाझडतीदेखील घेतली आहे. ंकागदपत्रात तफावतअमरावती : काही प्रभागात सफाई कंत्राटदारांचे मजूरसुद्धा कमी असल्याने दिसून आले. दौऱ्यानंतर ज्या प्रभागात उणिवा आढळून आल्यात, त्या प्रभागातील कंत्राटदारांची देयके, कामांचा दर्जा तपासताना आयुक्तांनी अनेक बाबींवर बोट ठेवले. सफाईची कामे व्यवस्थित होत आहे की नाही, ही यंत्रणा तपासण्यासाठी नागरिकांची स्वाक्षरी व मोबाईल क्रमांकाचा डाटा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या नवीन प्रणालीत साफसफाईची कामे केवळ कागदावर दाखविण्यात आली. एवढेच नव्हे तर मोबाईल क्रमांक आणि नागरिकांची नावे देखील बनावट नोंदवून स्वच्छता विभागाने देयके सादर करण्याचा प्रताप केला. ही बाब स्वत: आयुक्तांनी तपासली तेव्हा मोबाईल क्रमांक इतर व्यक्तीचा तर नावे दुसऱ्यांची निदर्शनास आली. देयकात अनियमितता असल्याने खरेच त्या प्रभागात साफसफाईची कामे झालीत काय? हे ‘क्रॉस’ तपासण्याची जबाबदारी कर निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. नगरसेवकांचे सफाई कंत्राटात हस्तक्षेप आढळल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तयारीदेखील आयुक्त गुडेवार यांनी चालविली आहे. स्वच्छता विभागप्रमुख गुल्हाणे यांचे निलंबन करताना त्यांच्यावर देयकात अनियमितता असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच क्रीडा विभागात कनिष्ठ लिपिक पदी कार्यरत प्रशांत पवार यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना आणि कामात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे. निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदेशाची प्रत देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)