शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्यांच्या कवडीमोल भावाने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: January 18, 2015 22:30 IST

वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट पसरले आहे. मात्र झाडावरील संत्र्यावरसुध्दा किडीचा प्रादुर्भाव झाल्याने संत्र्याची मागणी घटली. संत्र्याला १० ते ११ हजार रुपये प्रतिटन भाव मिळत a

संजय खासबागे - वरुडवरुड तालुक्यातील संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट पसरले आहे. मात्र झाडावरील संत्र्यावरसुध्दा किडीचा प्रादुर्भाव झाल्याने संत्र्याची मागणी घटली. संत्र्याला १० ते ११ हजार रुपये प्रतिटन भाव मिळत असल्याने संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. यामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. आंबिया बहराच्या संत्र्याचे आयुष्मान संपल्याने त्यामध्ये किडीचासुध्दा प्रादुर्भाव होऊन अळया पडत आहेत. वरुड तालुक्यात गत ७० वर्षांपासून संत्रा उत्पादन घेतले जात आहे. शेंदूरजनाघाट हे संत्राचे माहेरघर म्हणून प्रसिध्द आहे. येथे शास्त्रीय पध्दतीने संत्रा कलमांची निर्मिती केली जाते. शेकडो हेक्टर जमिनीत संत्राबागा तयार करण्यात आल्या आहेत. कोट्यवधींची उलाढाल या परिसरात होत होती.परंंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा संत्रा आंबिया बहराची फळे विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. आंतरराज्यीय बाजारपेठेत भाव कोलमडल्याने स्थानिक पातळीवर दर घसरले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संत्रा तोडला नसल्याने लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. १० ते ११ हजार रुपये प्रतिटनांचे भाव आहे. अनेक शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला. आजही ३० ते ४० टक्के संत्रा झाडावरच आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडल्यागत अवस्था झाली उत्पादन असले तरी भाव कमी असल्याने लाखो रुपयांचा भार संत्रा उत्पादकावर पडला आहे. संत्रा पिकाच्या मशागतीसाठी १२ ते १५ रुपये प्रति झाडाला खर्च येतो. दुष्काळी वर्षामध्ये उत्पादन खर्च काढणेही दुरापास्त झाल्याने संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट पसरले आहे.