अचलपुरात सव्वा लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:00:36+5:30

बियाबानी येथील मोहमद फिरोज शेख हुसेन व त्याचा भाऊ मोहम्मद शहजाद शेख हुसेन (२४) यांच्या राहत्या घरी राज्य शासनाद्वारे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्याची गोपनीय माहिती अचलपूर पोलिसांना मिळाली.

Gutka worth Rs 15 lakh seized in Achalpur | अचलपुरात सव्वा लाखांचा गुटखा जप्त

अचलपुरात सव्वा लाखांचा गुटखा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अचलपूर : बियाबानी परिसरातील एका राहत्या घरात साठवून ठेवण्यात आलेला सव्वा लाखांचा गुटखा अचलपूर पोलिसांनी धाड टाकून जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
बियाबानी येथील मोहमद फिरोज शेख हुसेन व त्याचा भाऊ मोहम्मद शहजाद शेख हुसेन (२४) यांच्या राहत्या घरी राज्य शासनाद्वारे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्याची गोपनीय माहिती अचलपूर पोलिसांना मिळाली.
ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोलीस कर्मचारी सिद्धार्थ, विनोद, नरेंद्र, सचिन, विशाल, कृष्णा, श्रीगणेश, सुनील, बंडू, महिला पोलीस रेश्मा, मंगला यांनी बियाबानी येथील मोहम्मद फिरोज शेख हुसेन व मोहम्मद शहजाद शेख हुसेन यांच्या घरी धाड टाकून १ लाख २५ हजार ५७५ रुपयांचा गुटखा जप्त केला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Gutka worth Rs 15 lakh seized in Achalpur