शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींची अडचण : पुढारी, नेत्यांमध्ये वाढली नियमांची धास्ती

By admin | Updated: September 27, 2014 00:56 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यामुळे राजकीय नेते कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत असून दरम्यान ताकसुध्दा फुंकून पीत आहेत.

जितेंद्र दखणे अमरावतीविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यामुळे राजकीय नेते कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत असून दरम्यान ताकसुध्दा फुंकून पीत आहेत.विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो यासाठी मागील महिन्यापासून सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याच क्षणापासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. साहजिकच राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह, अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही बंधने आली. ती आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार असल्याचे सर्वजण या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी घतली जात आहे. ग्रामीण भागात आदर्श आचारसंहितेची सखोल माहिती नसल्याने विविध कार्यक्रमांत जावे की नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही पडला आहे. कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात साहेबांना येता येते का? याची चौकशी कार्यकर्ते करीत आहेत. या कालावधीत उमेदवार नेत्यासह सर्वच मोठ्या नेत्यावर आयोगाच्या कर्मचाऱ्यांची नजर असते. नेते मंडळीसुध्दा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याअगोदर खातरजमा करुनच कार्यक्रमास सहभागी होताना दिसत आहेत. एरवी राजकीय नेते पदाधिकारी यांच्याशी सलोख्याने वागणारे अधिकारीही कारवाईच्या धास्तीने या लोकांपासून दूरच राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये अधिक गोची राजकीय पक्षांशी निगडित संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची होत आहे. बऱ्याच निवडणुकीत शिक्षक संघटना कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी निगडित आहेत. त्यांना मात्र एकीकडे आयोगाची धास्ती, दुसरीकडे साहेबांच्या परीक्षेच्या वेळीच त्यांना मदत करता येत नाही. त्यामुळे ते द्विधा मनस्थितीत आहेत. आजही ग्रामीण भागात गुरुजींचा शब्द प्रमाण मानला जातो. पण आदर्श आचारसंहितेमुळे शासकीय सेवेत असणाऱ्या गुरुजींची मोठी अडचण होताना दिसत आहे.