शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

हमीभाव ४८९२ तरी शेतकऱ्यांच्या पदरी ३८०० रुपये; उत्पादन खर्च निघणे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 12:44 IST

Bhandara : तेल महागले, पण सोयाबीन कवडीमोल, खरिपात सर्वाधिक पेरा कशाच्या बळावर?

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
केंद्र शासनाने २० टक्के आयात शुल्क लावल्यावर सोयाबीनसह सर्वच तेलांच्या दरात २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची दरवाढ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ४८९२ रुपये क्विंटल हमीभाव असताना मार्केटमध्ये सोयाबीनला ३८०० ते ४२०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणे कठीण आहे. 


बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. सद्यस्थितीत १३ ते १४ हजार सोयाबीनच्या पोत्यांची आवक होत आहे. नाफेडमध्ये १२ टक्के आर्द्रतेचा निकष आहे व दोन महिने चुकारे मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर अडचणीत सापडलेले शेतकरी सोयाबीन विक्रीला आणत आहेत. व्यापाऱ्यांद्वारा सोयाबीनची मातीमोलभावाने खरेदी होत आहे. 


सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढला आहे. पेरणीपूर्व मशागत ते काढणीपर्यंत एकरी किमान २० हजार रुपयांचा खर्च येतो. यंदा उतारा घटल्याने शेतकऱ्यांच्या हाती पोतभर सोयाबीनही उरत नाही. सोयाबीनला वर्षभर हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे खरिपात सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीन संकटात आले आहे. सबब, शेतकरी हवालदिल झाला आहे. 


दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची कोंडी 
आर्थिक अडचणीतील शेतकरी दिवाळीपूर्वी सोयाबीन विक्रीला आणत असताना व्यापाऱ्यांद्वारा शेतकऱ्यांची कोंडी करण्यात येत आहे. सोयाबीन साठवणुकीला पुरेशी जागा नाही, शेतमजुरांचे चुकारे राहिले आहेत. दहा दिवसांवर दिवाळीचा सण आलेला आहे.


सोयाबीनचे बाजारभाव (रु/क्विं) 
०९ ऑक्टोबर        ३६०० ते ४२००
११ ऑक्टोबर         ३९५० ते ४३९९ 
१४ ऑक्टोबर         ३८०० ते ४३२५
२६ ऑक्टोबर         ३८०० ते ४३००
१८ ऑक्टोबर         ३८०० ते ४११२


"नवीन सोयाबीनमध्ये आर्द्रता जास्त आहे. त्यामुळे कमी भाव मिळत आहे. नाफेडमध्ये असे सोयाबीन घेतले जात नाही. त्यामुळे दोन्ही प्रकारांत शेतकऱ्यांची कोंडी होत आहे." 
- अशोक आवारे, शेतकरी

टॅग्स :AmravatiअमरावतीfarmingशेतीSoybeanसोयाबीनMSP Mandalमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ