शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

किडनीच्या आजारात वाढ, सुपरस्पेशालिटी ठरते वरदान

By admin | Updated: March 9, 2017 00:16 IST

देशामध्ये किडनी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अंबानगरीतही अनेक रुग्ण आढळतात.

जागतिक किडनी दिन : किडनी प्रत्यारोपण सुविधा उपलब्धअमरावती : देशामध्ये किडनी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अंबानगरीतही अनेक रुग्ण आढळतात. यामध्ये अशा रुग्णासाठी येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल वरदान ठरले आहे. येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) अमरावतीमध्ये किडनी ट्रान्सप्लान्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सन २००८ मध्ये या रुग्णालयाची प्रगती होत आहे. जीवनदायीतून नि:शुल्क सुविधाअमरावती : पाचही जिल्ह्यांतील रुग्णांना येथे चांगली सेवा देण्यात येते. या रुग्णालयात दरवर्षी पाच ते साडेपाच हजार डायलिसीसचा उपचार होतात. सध्या या रुग्णालयात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील १५० रुग्णांवर डायलेसीस सुरू आहे. किडनीच्या आजाराच्या रुग्णांकरिता डायलेसीस हा तात्पुरता उपचार असून, अशा रुग्णांवर किडनी प्रत्यारोपणाद्वारे रुग्णाला जीवदान मिळू शकते. अमरावती शहरात आतापर्यंत ही सुविधा उपलब्ध नव्हती. परंतु आता शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालय अमरावती येथे ही सुविधा शासनाच्या आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिली आहे. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेचा खर्च ४ ते ५ लाखांपर्यंत येतो. मात्र, या रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत असल्यामुळे रुग्णांना विनामूल्य ही सेवा मिळणार आहे. गुरुवार ९ मार्च हा जागतिक किडनी दिन म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सुपर स्पेशालिटी रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचे घोषवाक्य ‘निरोगी किडनीसाठी निरोगी जीवनशैली’ हे आहे. याप्रसंगी किडनी विविधज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्यामसुंदर निकम यांनी जनतेस केले आहे. किडनी आजाराची लक्षणेलघवीत जळजळ होणे, वारंवार लघुशंकेला जाणे, पायावर सुज येणे, धूम्रपान आदी लक्षणे किडनी आजाराची असून शकतात. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. किडनीच्या आजाराची कारणेवेदनाशामक औषधींचे अधिक सेवन, जंतु संसर्ग झाल्यास,मधुमेह, उच्च रक्तदाब, अती लठ्ठपणा शरिरात चरबीचे प्रमाण आदी कारणे आहेत. नियंत्रण कसे ठेवाल. वजन कमी करणे, मधुमेह नियंत्रण ठेवणे, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, औषधींचा गैरवापर टाळणे, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्लेशिवाय औषधी खावू नये.