शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

यशोमतींचा स्वभाव न आवडल्याने मैदानात

By admin | Updated: September 13, 2014 00:49 IST

यशोमती ठाकूर यांच्यासाठी मी १० वर्षे काम केले; तथापि त्यांचा स्वभाव न आवडल्यामुळे मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, ...

अमरावती : यशोमती ठाकूर यांच्यासाठी मी १० वर्षे काम केले; तथापि त्यांचा स्वभाव न आवडल्यामुळे मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका यशोमती यांच्या धाकट्या बहीण संयोगिता नाईकनिंबाळकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत मांडली. यशोमतींसारखी बहीण असल्याचा मला गर्व आहे, असे सांगत फिरणाऱ्या संयोगितांनी आज यशोमतींविरुद्ध अनेक आरोप केलेत. तिवसा तालुक्यातील सातरगाव येथील रहिवासी असण्याबाबतचे आवश्यक ते पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्यात आली असतानासुद्धा यशोमती यांच्या राजकीय दबावामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध निकाल दिला, असा आरोप संयोगिता यांनी केला. नाईकनिंबाळकर हे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी नसल्यामुळे त्यांना दिलेला रहिवासी दाखल उपजिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीअंती रद्द ठरविला, हे येथे उल्लेखनीय. सातरगावचे पं.स.सदस्य चंद्रशेखर ठाकूर यांच्या निवासस्थानी मी भाड्याने राहते. तसा भाडेकरारदेखील करण्यात आला आहे, अशी माहिती संयोगिता यांनी यावेळी दिली. मागणी करूनही त्यांनी तहसीलदारांनी नोंदविले बयाणअमरावती : कराराच्या प्रती मात्र पत्रकारांना वितरीत केल्या नाहीत. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चंद्रशेखर ठाकूर यांच्या घरी तहसीलदार, तलाठी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी पोहचलेत. या अधिकाऱ्यांसोबत आलेल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी संयोगिता निंबाळकर येथे राहतात का, अशी विचारणा केली. त्या येथे राहतात, असे सांगण्यात आले. सोनाली ठाकूर यांना अर्वाच्य शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. कमलाकर वाघ यांच्यासह तीन जणांविरुद्ध सोनाली ठाकूर यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली, अशी माहिती संयोगिता यांनी दिली. तहसीलदारांनी नियमबाह््यरीत्या घरमालक महिलेचे खोटे बयाण नोंदविल्याचा आरोप संयोगिता यांनी केला. तहसीलदारांच्या अशा वागणुकीची तक्रार का केली नाही, या प्रश्नावर मात्र संयोगिता यांच्याकडे उत्तर नव्हते. यशोमती या राजकीय लाभासाठी ठाकूर या नावाचा वापर करीत असून त्यांनी ‘यशोमती राजेश सोनवणे’ या नावाने राजकारण करावे, असे आव्हान संयोगिता यांनी यशोमतींना दिले. - अन् त्या गोंधळल्यादहा वर्षांपासून मी येथील रहिवासी आहे. सातत्याने विकासकामे केलीत, असे सांगणाऱ्या संयोगिता यांना विकासकामांची माहिती विचारण्यात आली त्यावेळी त्यांचा चेहरा कसानुसा झाला होता. या उमेदवारीशी इंडियाबुल्सचा काही संबंध आहे काय, या गंभीर प्रश्नावर 'मला बोलायचे नाही,' असे उत्तर संयोगिता यांनी दिले. 'वेळ आल्यावर सांगू', 'यावर मला बोलायचे नाही', 'ते मी सांगणार नाही', अशी उत्तरे संयोगितांना वारंवार द्यावी लागली. पत्रपरिषदेला शंतनू देशमुख, चंद्रशेखर ठाकूर, आंनद शर्मा, सुरजसिंह राठोड हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)