शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
3
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
4
बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (video)
5
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
6
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
7
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
8
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
9
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
10
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
11
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
12
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
13
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
14
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
15
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
16
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
17
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
18
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
19
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
20
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
Daily Top 2Weekly Top 5

बडनेर्‍यात पाण्याची भीषण समस्या

By admin | Updated: May 20, 2014 23:21 IST

बडनेरा शहरात कृत्रिम पाणी टंचाईची समस्या भीषण झाली आहे. सार्वजनिक नळांवर पाण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत असून नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे.

सार्वजनिक नळावर झुंबड : जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती

बडनेरा : बडनेरा शहरात कृत्रिम पाणी टंचाईची समस्या भीषण झाली आहे. सार्वजनिक नळांवर पाण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत असून नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पाईपलाईन ‘लिकेज’ असल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांमध्ये नियोजनाचा अभाव असल्यामुळेच बडनेर्‍याचा पाणी प्रश्न भीषण स्वरुप घेत आहे. अमरावती शहरात मुबलक पाणी असताना मात्र केवळ जीवन प्राधिकरण अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे बडनेरा शहराला पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जीवन प्राधिकरणाने बडनेर्‍यातील जुन्यावस्तीत नवीन टाकी उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र त्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरात मिळालेली नाही. जोपर्यंत नवीन टाकी उभारल्या जात नाही तो पर्यंत बडनेरातील पाणी समस्या कायम राहण्याचे चिन्हे दिसत आहेत. (शहर प्रतिनिधी) सार्वजनिक नळांना दूषित पाण्याचा पुरवठा आधीच पाणी कमी त्या समस्येमुळे त्रस्त असणार्‍या बडनेरातील नागरिकांना सार्वजनिक नळांवर पाणी भरताना दूषित पाण्याचा नाईलाजास्तव वापर करावा लागत आहे. अशोकनगर परिसरातील सार्वजनिक नळातून हिरव्या रंगाचे पाणी मिळत असल्याची ओरड महिलांची आहे. बडनेरा शहरात पाईप लाईनमध्ये ठिकठिकाणी लिकेजेस असल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. सार्वजनिक नळांवर एकच झुंबड जुन्यावस्ती व नव्या वस्तीतील अशोकनगर, हरीदासपेठ, हमालपुरा, लढ्ढा प्लॉट, शिवाजीनगर या वस्त्यांमधील सार्वजनिक नळांना जेमतेम पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असून यातून वादाची स्थितीही निर्माण होत आहे.