शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
4
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
5
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
6
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
7
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
8
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
9
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
10
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
11
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
12
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
13
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
14
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
15
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
16
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
17
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
18
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
19
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
20
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानातून कर्जकपात; शासनाचे चौकशीचे आदेश

By admin | Updated: December 11, 2014 22:59 IST

तिवसा तालुक्यातील पालवाडी येथील कर्जबाजारी महिला शेतकऱ्याच्या आत्महत्येची दखल घेऊन दिलेल्या अनुदानातून कर्जकपातीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच आ. यशोमती ठाकूर यांनी

अमरावती : तिवसा तालुक्यातील पालवाडी येथील कर्जबाजारी महिला शेतकऱ्याच्या आत्महत्येची दखल घेऊन दिलेल्या अनुदानातून कर्जकपातीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच आ. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रकार मांडला. याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या निषिध्द प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले.
पालवाडी येथील आत्महत्याग्रस्त महिला शेतकऱ्याच्या वारसांना दिलासा देण्याकरिता ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ३० हजार रुपयांचा धनादेश मृताच्या वारसांना देण्यात आला. या अनुदानातून स्टेट बँक आॅफ इंडियाच्या तिवसा शाखेने कर्जकपात केली. याविषयीचे वृत्त 'लोकमत'मध्ये गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध होताच अनेक संघटनांनी या प्रकराचा निषेध केला. विधिमंडळात सुरू असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या चर्चेवर तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भात गुरुवारचा ‘लोकमत’चा अंक पुराव्यादाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी चौकशी व तातडीने कारवाईचे आश्वासन सभागृहाला दिले.
बँकेच्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांप्रती असणाऱ्या या धोरणाचा निषेध केला. त्यांनी तहसीलदार विजय लोखंडे यांना निवेदन देऊन बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. भाजपच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी यांनी कृषिमंत्री एकनाथ खडसे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली व या शेतकरी परिवारासह त्यांचे कर्जकपातीचे पैसे परत देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. भावनाशून्य व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांमुळे शासन योजनेचे मातेरे होत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.
तिवसा तालुक्यातील पालवाडी येथील यशोदा देवेंद्र कांबळे(३८) या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ आॅगस्ट २०१४ रोजी घडली. मृत महिलेच्या नावे अडीच एकर शेत आहे. त्यांनी मे महिन्यात ३५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. पेरणी केलेले बियाणे निकृष्ट निघाल्याने सोयाबीन उगवलेच नाही. दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. कसं जगावं, या विवंचनेत या महिला शेतकऱ्याने आत्महत्या केली. प्रकरण निकषपात्र असल्याने या महिलेच्या वारसास ७० हजाराचा बाँड व ३० हजारांचा धनादेश मंगळवार ९ डिसेंबर रोजी देण्यात आला. जिल्ह्यात दुष्काळ घोषित असताना व सक्तीने कर्ज वसुली करु नये, असे शासनाचे आदेश असताना तिवसा एसबीआय शाखेद्वारा अनुदानाच्या राशीमधून कर्जकपात करण्यात आल्याच्या या निंदणीय प्रकाराविषयी सर्वस्तरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)