शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

ई-निवडणूक पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुका

By admin | Updated: March 11, 2015 00:28 IST

जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या सर्व निवडणुका प्रथमच ई-निवडणूक पद्धतीने होणार आहे.

लोकमत विशेषअमरावती : जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या सर्व निवडणुका प्रथमच ई-निवडणूक पद्धतीने होणार आहे. संगणकीय प्रणालीद्वारे सर्व प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे दोष विरहीत व कमी वेळेत होण्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीमध्ये शासनाच्यावतीने सर्व क्षेत्रामध्ये संगणक व इंटरनेट प्रणालीचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारापासून राज्य शासनाच्या कामकाजापर्यंत या प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे. यामुळे विविध कामकाजामध्ये पारदर्शकता आली असून तसेच कमी वेळेमध्ये काम होत आहे. अशातच पैशाचीही बचत होत आहे. सर्वच विभागात या प्रणालीचा उपयोग वाढत असल्यामुळे कामकाजामध्येही सुलभता आली आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणक व इंटरनेट प्रणालीचा उपयोग करून घेतल्या जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यात होऊ घातलेल्या ५३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी याचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. विशिष्ट आज्ञावली अर्थात सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले आहे. यांच्या माध्यमातूनच उमेदवारी अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिलेल्या नमुन्यामध्ये व निर्देशाप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये अर्ज भरावा लागणार आहे. याची प्रिन्ट काढून पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे. यावर अधिकाऱ्यासमोर सही करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया किचकट स्वरुपाची असते. शासनाला यामध्ये मनुष्यबळ व पैसा अधिक प्रमाणात खर्च करावा लागतो यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ई-निवडणूक पद्धत महत्वाची ठरणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यामुळे वेळ वाचणार आहे. मात्र निवडणूक लढवू इच्छूकांना यासाठी गावखेड्यातून तालुका अथवा सुविधा असलेल्या ठिकाणी जावूनच प्रक्रिया करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)