शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या १२ तासात पकडला २९ लाखांचा माल

By admin | Updated: September 23, 2015 00:13 IST

नांदगाव खंडेश्वर ठाण्यांतर्गत मंगरुळ चव्हाळानजीक २० सप्टेंबरच्या रात्री ट्रक चालकाला झाडाला बांधून ट्रकमधील दारूसह ट्रक पळवून नेला होता.

सहा आरोपी गजाआड : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईअमरावती : नांदगाव खंडेश्वर ठाण्यांतर्गत मंगरुळ चव्हाळानजीक २० सप्टेंबरच्या रात्री ट्रक चालकाला झाडाला बांधून ट्रकमधील दारूसह ट्रक पळवून नेला होता. मात्र, गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या बारा तासांत आरोपींसह मुद्देमालाचा शोध लावला आहे. याप्रकरणातील नागपूर आणि अमरावतीच्या सहा आरोपींना अटक करण्यात आली असून या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यामुळे ट्रक लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होण्याचे संकेत आहेत. नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील मंगरुळ चव्हाळा ते सालोड मार्गावर कोपरगाव येथून नागपूरकडे १७ लाख रूपयांची दारू घेऊन जाणारा ट्रक पी.जे.-०४ जे.- ५३६९, हा २० सप्टेंबरच्या मध्यरात्री सालोड शिवारात येताच ट्रकचा पाठलाग करणारे टेम्पो क्रुझर हे चार चाकी वाहन ट्रकला आडवे झाले. ट्रक चालक शेख इब्राहिम (३५, रा. नागपूर) याने प्रसंगावधान राखून ट्रक थांबविला. परंतु लगेच चारचाकीतील तीन आरोपींनी ट्रकचा ताबा घेतला. ट्रकला दोन-तीन कि.मी. पुढे नेले आणि चालकाला रस्त्यालगतच्या पळसाच्या झाडाला दोरीने बांधून ठेवले व आरोपी ट्रक घेऊन पसार झाले. पहाटेपर्यंत ट्रकचालक झाडाला बांधलेल्या अवस्थेत होता. दिवस उजाडल्यानंतर त्याने आरडाओरडा केला असता गावातील काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. लगेच नांदगाव खंडेश्वर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा ट्रक कोपरगावहून नागपूरच्या दिशेने दारू घेऊन निघाला होता. ट्रकमध्ये नागपूर निवासी जेसवाणी यांच्या मालकीची सुमारे १७ लाख रूपयांची दारू होती. आरोपी सोनू पठाण (२१, नागपूर), बादल ठाकूर (२०, नागपूर), अक्षय खलगे (२०, नागपूर), पवन बेलोरकर (२१, नागपूर), अब्दुल शहजाद (२३, अमरावती), गजानन डिके (५०, अमरावती) यांनी चारचाकीतून या ट्रकचा पाठलाग केला. या सिनेमास्टाईल प्रकारणाचा मुख्य सूत्रधार गजानन डिके हा होता. ट्रक पळविल्यानंतर त्यातील दारुची आणि ट्रकची विल्हेवाट अमरावतीमध्ये लावली जाणार होती. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रयत्नांमुळे दारूसह ट्रक आणि पाठलाग करणारे चारचाकी वाहन व आरोपींना अटक करण्यात यश आले.स्थानिक गुन्हे शाखेला नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी मदत केली. त्यामुळेच एवढा मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. - शैलेश शेळकेठाणेदारपोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर.