शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ८० अनधिकृत धार्मिक स्थळांवर गंडांतर

By admin | Updated: April 2, 2016 00:03 IST

शहरातील ८० अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी महापालिकेने घोषित केली आहे.

आक्षेप मागवले : लवकरच निष्कासन अमरावती : शहरातील ८० अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी महापालिकेने घोषित केली आहे. या स्थळांवर लवकरच निष्कासनाची कारवाई केली जाणार असल्याने यंत्रणेने आक्षेप किंवा हरकती मागविल्या आहेत. शासन निर्णय क्र. सीटीएम-९०९/प्र.क ५५८ भाग २/विशा-ब दि. ५ मे २०१५ मधील निर्देशांनुसार २९ सप्टेंबर २००९ नंतरच्या निष्कासित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्थळांची यादी महापालिका झोन कार्यालयामार्फत तयार करण्यात आली आहे. या यादीत नमूद धार्मिक स्थळांचे निष्कासन महापालिकेकडून करण्यात येणार असल्याने या कारवाई संदर्भात संबंधित झोन कार्यालयात आक्षेप वा हरकती नोंदवायच्या आहेत. २९ एप्रिलपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे. संबंधित झोन कार्यालय प्राप्त हरकतींच्या अनुषंगाने महापालिकास्तरिय समितीकडे अहवाल सादर करणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर संपूर्ण राज्यातच अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिका क्षेत्रातील अनधिकृत धार्मिकस्थळांवर वरवंटा फिरविला जाण्याची शक्यता अधिक आहे. उत्तर झोन क्रमांक १ रामपुरी कॅम्पमधील २४, मध्य झोन क्रमांक २ मधील ८, पूर्व झोन क्र. ३ मधील ११, दक्षिण झोन बडनेरामधील ३६ आणि पश्चिम झोन क्र. ५ भाजीबाजारमधील १ अशा एकूण ८० धार्मिक स्थळांचा यात समावेश आहे.