कुष्ठ बांधवांना दोन हजार रुपये मानधन मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 22:50 IST2017-08-16T22:50:17+5:302017-08-16T22:50:47+5:30

मुंबई, पुणे, औरंगाबाद महापालिका धर्तीवर अमरावती शहरातील कुष्ठ बांधवांना प्रतिमाह दोन हजार रुपये मानधन मिळवून देणार असा संकल्प आमदार रवी राणा यांनी येथे बुधवारी केला.

Give two thousand rupees to the leprosy patients | कुष्ठ बांधवांना दोन हजार रुपये मानधन मिळवून देणार

कुष्ठ बांधवांना दोन हजार रुपये मानधन मिळवून देणार

ठळक मुद्देशासकीय शिबिर : रवी राणा यांचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुंबई, पुणे, औरंगाबाद महापालिका धर्तीवर अमरावती शहरातील कुष्ठ बांधवांना प्रतिमाह दोन हजार रुपये मानधन मिळवून देणार असा संकल्प आमदार रवी राणा यांनी येथे बुधवारी केला.
येथील महापालिका टाऊन हॉलमध्ये युवा स्वाभीमान आणि कुष्ठ रोग सहायक आरोग्य सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुष्ठ बांधवांचे मानवीय अधिकारअंतर्गत शासकीय सेवा योजना शिबिराप्रसंगी अध्यक्षस्थानाहून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक विकास आमटे तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुलकर्णी, कुष्ठ व क्षय रोग सहायक संचालक संजू कांबळे, गोविंद कासट, विधी व न्याय सभापती सुमती ढोके, नगरसेवक आशिष गावंडे, नगरसेविका सपना ठाकूर, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ.राणा म्हणाले, कुष्ठ रुग्णांसाठी विकास आमटे यांचे सर्मपित भावनेतून काम आहे. कुष्ठरुग्णांना जात, पंथ, धर्म नसतो. त्यामुळे त्यांना जगण्याचा आधार मिळावा, यासाठी महापालिकेतून कुष्ठरुग्णांना प्रतिमाह दोन हजार रुपये मानधन मिळवून देणार, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला संजय हिंगासपुरे, अयूब खान, टी.एम. आऊलदार, उमेश ढोणे, सचिन भेंडे, अजय घुले, निशांत वानखडे, रितेश ठाकरे, रितेश बेठारीया, अनिल तंतरपाळे, दीपक गडलिंग, किशोर गवई, कविता रामटेके, पल्लवी सपकाळ, विकास कुरवाडे, अनिल गवई आदी उपस्थित होते.

Web Title: Give two thousand rupees to the leprosy patients