आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे- शेखर भोयर

By Admin | Updated: June 17, 2014 23:57 IST2014-06-17T23:57:55+5:302014-06-17T23:57:55+5:30

आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनाने शिक्षणाचा अधिकार दिला आहे. परंतु शिक्षकांच्या अधिकाराची लढाई अद्याप अपूूर्ण आहे. निवडून आल्यास ती लढाई पूर्ण करायची आहे. त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त

To get free education for children of suicide victims: Shekhar Bhoyar | आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे- शेखर भोयर

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे- शेखर भोयर

अमरावती : आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनाने शिक्षणाचा अधिकार दिला आहे. परंतु शिक्षकांच्या अधिकाराची लढाई अद्याप अपूूर्ण आहे. निवडून आल्यास ती लढाई पूर्ण करायची आहे. त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचे पर्ू्ण शिक्षण मोफत करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही शेखर भोयर यांनी दिली. यवतमाळ येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
शिक्षकांनी कौल दिल्यास निवडून आल्यानंतर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी गणवेश योजना लागू केली जाईल. इतकेच नव्हे तर शिक्षकांच्या संदर्भातील सर्व नियम, योजना सवलती, वेतन व वेतनेतर माहितीही उपलब्ध करून देणार, असा संकल्प यावेळी शेखर भोयर यांनी व्यक्त केला. विदर्भातील शेतकऱ्यांवर कर्जामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान पॅकेजच्या माध्यमातून शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. विधानपरिषदेत नेतृत्व करण्याची संंधी मिळाल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचे सर्व शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू करून मोफत केले जाईल, असेही यावेळी भोयर यांनी सांगितले.
याशिवाय शालेय गणवेशाच्या योजना सर्व घटकांतील विद्यार्थ्यांसाठी लागू करून कोणालाही या योजनेपासून वंचित न ठेवण्याचा संकल्प यावेळी भोयर यांनी केला. शिक्षक अद्ययावत झाल्यास त्याचे अध्यापन सुध्दा प्रभावी होईल. याकरिता प्रत्येक शिक्षकाला लॅपटॉप खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद करण्याचा मानस यावेळी भोयर यांनी व्यक्त केला. इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षक व शाळेसंदर्भातील प्रत्येक अद्ययावत माहिती शिक्षकांच्या हाती उपलब्ध करून दिली जाईल, असेही शेखर भोयर यांनी सांगितले. अद्याप शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. संधी मिळाल्यास शिक्षकांचे सक्षमपणे नेतृत्व करून या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास यावेळी शेखर भोेयर यांनी शिक्षकांना दिला.

Web Title: To get free education for children of suicide victims: Shekhar Bhoyar