शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

२० आॅक्टोबरपूर्वी नगरपरिषदांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम ?

By admin | Updated: October 15, 2016 00:15 IST

जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांचा कार्यकाळ २७ डिसेंबर २०१६ रोजी संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वी सार्वजनिक निवडणूक होणार आहे.

२७ डिसेंबरला मुदत संपणार: आज जाहीर होणार प्रभागनिहाय मतदार यादी अमरावती : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांचा कार्यकाळ २७ डिसेंबर २०१६ रोजी संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वी सार्वजनिक निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाची लगभग वाढली आहे. १५ आॅक्टोबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होत असल्याने २० आॅक्टोबरच्या आत नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील धामणगाव, चिखलदरा, शेंदूरजना घाट, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड, दर्यापूर, चांदूर रेल्वे, चांदूरबाजार व मोर्शी नगरपरिषदांचा कार्यकाल हा येत्या २७ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी सार्वत्रिक कार्यकाळ हा येत्या २७ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी आयोगाची लगबग सुरू आहे. सद्यस्थितीत या नऊही नगरपरिषदांमध्ये मतदार यादीचा कार्यक्रम २६ सप्टेंबरपासून राबविण्यात आला. २६ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबर या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना मागविण्यात आल्यात. त्यावर सुनावणी होऊन १५ आॅक्टोबरला प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहेत. या दिनांकानंतर कुठल्याही क्षणी राज्य निवडणूक आयोगाद्वारा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होणार आहेत. १७ किंवा २० आॅक्टोबरला हा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, अशी माहिती नगरविकास विभागाच्या सूत्रांनी दिली. यापूर्वी ५ आॅक्टोबरला मंत्रालयाच्या परिषद सभागृहात नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत पार पडली. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच उमेदवारीचे बाशिंग बांधून इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)नगराध्यक्षाची थेट जनतेमधून होणार निवडराज्य निवडणूक आयोगाचे २३ सप्टेंबरच्या पत्रानुसार यावर्षी प्रथमच थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे या पदासाठी मोठ्या संख्येनी उमेदवार रिंगणात राहतील. नगराध्यक्षांचे आरक्षणदेखील जाहीर झाल्याने कुणाला उमेदवारी द्यावी, असा पेच पक्षनेतृत्त्वाला पडला आहे. जिल्ह्यात धामणगाव सर्वसाधारण, धामणगाव सर्वसाधारण स्त्री राखीव, शेंदूरजना घाट अनु. जाती, अचलपूर नामाप्र स्त्री राखीव, अंजनगाव सर्वसाधारण, वरुड सर्वसाधारण स्त्री राखीव, दर्यापूर सर्वसाधारण, चांदूररेल्वे नामाप्र, चांदूरबाजार नामाप्र व मोर्शीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गात महिलासाठी राखीव आहे.