श्रद्धेला पावणारा उजव्या सोंडेचा गणपती

By Admin | Updated: September 7, 2016 00:23 IST2016-09-07T00:23:08+5:302016-09-07T00:23:08+5:30

कामाला सुरूवात अथवा व्यापाराचा शुभारंभ करण्यापूर्वी उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय आजही पुढे पाऊल टाकण्याचा निर्धार कुणीही करीत नाही.

Ganapati is the right hand man of faith | श्रद्धेला पावणारा उजव्या सोंडेचा गणपती

श्रद्धेला पावणारा उजव्या सोंडेचा गणपती

मोहन राऊत धामणगाव रेल्वे 
कामाला सुरूवात अथवा व्यापाराचा शुभारंभ करण्यापूर्वी उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय आजही पुढे पाऊल टाकण्याचा निर्धार कुणीही करीत नाही. कामगार व व्यापाऱ्यांच्या श्रद्धेचा म्हणून शहरातील जुन्या बीजीटीआय येथील पुरातन गणपती मंदिराची ही ओळख आहे़
धामणगाव शहर एकेकाळी व्यापारी नगरी म्हणून ओळखले जात असत. जयरामदास भागचंद या उद्योग समूहाचे मालक भागचंद अग्रवाल यांनी १८९५ मध्ये जयपूर येथून ७ फूट उंचीची उजवी सोंडेची संगमरवरी दगडाची मूर्ती स्वत: आणून त्यांच्या इंडस्ट्रीजमध्ये प्राणप्रतिष्ठा केली होती़ सतत अखंड आठ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून अन्नकुट केला होता़ त्यानंतर ही इंन्डस्ट्रीज नेमाणी यांना, तर त्यानंतर भारत जनरल अ‍ॅन्ड टेक्सटाईल इन्डस्ट्रीज या बिर्ला समूहाच्या उद्योगाला विकण्यात आली़ त्यावेळी कापसाकरिता प्रसिध्द असलेल्या या शहरात बिर्ला उद्योग समूहाच्यावतीने प्रसिद्ध असलेल्या या शहरात बिर्ला उद्योग समूहाच्यावतीने जिनिंग़, प्रेसिंग आॅईल व रिफाईन्डींग हे उद्योग चालविण्यात आले. येथे उत्पादित सरकीचे तेल मध्यप्रदेश व महाराष्ट्रात रेल्वे बोगीने पाठविले जायचे. त्यामुळे २ ते ३ राज्यांतील व्यापारी लघु उद्योगासाठी येत असत. येथे काम करणारे कामगार, हमाल व्यापारी उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेत. बीजीटीआय या उद्योग समूहाकडून राकेश खत्री यांनी ही जिनिंग खरेदी केली़ आपण या गणेशाचे दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही कार्याला सुरूवात करीत नाही, असे राकेश खत्री यांनी सांगितले़ पुरातन मंदिरात दर चतुर्थीला शहरातील भाविक आजही दर्शनाला येतात़ नवसाला पावणारा गणपती म्हणून या मूर्तीची ओळख असल्याचे संस्थाध्यक्ष शरद अग्रवाल यांनी सांगितले़

Web Title: Ganapati is the right hand man of faith