पिंपरी यादगिरे येथे जुगार पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:24 AM2021-03-04T04:24:13+5:302021-03-04T04:24:13+5:30

अमरावती : बडनेरा पोलिसांनी येथील पिंपरी यादगिरे येथे धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ...

Gambling at Pimpri Yadgire | पिंपरी यादगिरे येथे जुगार पकडला

पिंपरी यादगिरे येथे जुगार पकडला

Next

अमरावती : बडनेरा पोलिसांनी येथील पिंपरी यादगिरे येथे धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. आरोपी युवराज रामरावजी रामटेके (२८), विशाल सुरेश मेश्राम (२८, दोन्ही रा. पिनपरी यादगिरे) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------------------

अवैध दारूसह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी फ्रेजरपुरा परिसरात कारवाई करून अवैध दारुसह दुचाकीसह ५६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. आरोपी मंगश बाबाराव कुयटे (३७, उतखेड), युगल प्रदीप सोळंके(२७, रा. उतखेड) विरुद्ध गुन्हा नोंदविला. सदर आरोपी पोत्यात अवैध दारुची वाहतूक करताना आढळून आले.

--------------------------------------------------------

वडरपुऱ्यात गावठी दारू जप्त

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील वडरपुऱ्यात कारवाई करून ४ हजार रुपयांची गावठी दारू जप्त केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. आरोपी गजानन गंगाराम मंजुळकर (२९, रा. वडरपुरा) विरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलिसांनी प्लॅस्टिकच्या डबकीत साठवून ठेवलेली २० लीटर गावठी दारू जप्त केली.

--------------------------------------------------------------

लक्ष्मीनगरात अवैध दारू जप्त

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी येथील लक्ष्मीनगरात कारवाई करून अवैध दारूसह ९,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. आरोपी सर्वेश अशोक जयस्वाल (१९, रा. लक्ष्मीनगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------------------------

रमाबाई आंबेडकरनगरातून दारू जप्त

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी रमाबाई आंबेडकरनगरात कारवाई करून ६०० रुपयांची दारू मंगळवारी जप्त केली. आरोपी मंगेश गणेश ढोके (३५, रा. रमाबाई आंबेडकरनगर)विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: Gambling at Pimpri Yadgire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.