शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फुटाणे विक्रेत्याच्या मुलाची उत्तुंग भरारी

By admin | Updated: May 26, 2016 01:19 IST

मनात जिद्द व अथक परिश्रम घेण्याची ताकद असली तर यश खेचून आणणे अवघड जात नाही़ वडील फुटाणे विक्रीचा व्यवसाय ...

राहुल गुप्ता ९१.५३ : जिद्दीच्या बळावर यश धामणगाव रेल्वे : मनात जिद्द व अथक परिश्रम घेण्याची ताकद असली तर यश खेचून आणणे अवघड जात नाही़ वडील फुटाणे विक्रीचा व्यवसाय व आई गृहिणी तसेच घरी कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना शहरातील राहुल गुप्ताने संघर्षावर मात करीत ९१़५३ टक्के गुण मिळविले आहे़ स्थानिक कॉटन मार्केट चौकात गुप्ता यांचे छोटेसे फुटाणे विक्रीचे दुकान आहे़ विद्यानगरीची मान उंचावणाऱ्या राहुलचे वडील सरोज गुप्ता हे तालुक्यातील आठवडी बाजारात फुटाणे विक्री करण्याचा व्यवसाय करतात़ दररोज येणाऱ्या या फुटाणे विक्रीतून संसाराचा गाडा चालविणाऱ्या वडिलाच्या अथक परिश्रमाची जाण राहुलला आहे. कॉलेजमधून आल्यानंतर वडिलाच्या व्यवसायाला हातभार लावत होता. रात्री अभ्यास करणाऱ्या राहुलने शिकवणी वर्ग लावला नाही़ केवळ दोन तास अभ्यास करून ९१ टक्के गुण मिळविलेल्या राहुलचे अभियंता व्हायचे स्वप्न आहे़ यापूर्वी कोणीही कुटुंबातील सदस्य गुणवत्ता यादीत झळकला नाही. त्यामुळे राहुलच्या अपार मेहनतीवर जन्मदात्याला मोठा अभिमान आहे. घरी आर्थिक परिस्थिती जेमतेम असली तर आपण आपल्या गुणवंत्त पाल्याचे शिक्षण पूर्ण करेन, असा प्रामाणिक आत्मविश्वास राहुलचे वडील सरोज गुप्ता यांनी व्यक्त केला. राहुलचा छोटा भाऊ शुभम हा सेफ़़ला़हायस्कूल मध्ये आठवीत आहे़(तालुका प्रतिनिधी)