शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकाच्या पार्थिवावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:11 IST

फोटो - पी/२७/शहीद फोल्डर परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहिकरच्या पार्थिवावर देवगाव शिवारात सातपुडा पर्वताच्या साक्षीने ...

फोटो - पी/२७/शहीद फोल्डर

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहिकरच्या पार्थिवावर देवगाव शिवारात सातपुडा पर्वताच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडला. या दरम्यान सशस्त्र सैन्य दलासह राज्य पोलीस दलाकडून त्याला मानवंदना देण्यात आली. मेळघाटच्या पंचक्रोशीतून याप्रसंगी जनसागर उसळला होता. अमर रहे, अमर रहे, भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

रविवार २७ डिसेंबरला नागपूरहून दुपारी २ वाजताच्या दरम्यान कैलासचे पार्थिव पिंपळखुटा येथे दाखल झाले. ते परतवाडा शहरासह मार्गातील धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गढीतील युवकांसह पुरुष व महिलांनी एकत्र येत हातात तिरंगा घेत मार्गावर उभे राहून त्यास श्रद्धांजली अर्पण केली.

पिंपळखुटा गावासह देवगाव परिसरात प्रत्येक घरांपुढे सडासारवण करीत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सर्वप्रथम कैलासचे पार्थिव पिंपळखुटा येथील त्याच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टररुपी रथावर ते पार्थिव ठेवून अंतिमसंस्कार स्थळी आणल्या गेले.

दत्तप्रभू आश्रमशाळेमागील गजानन येवले यांच्या शेतात त्या पार्थिवावर शासकीत इतमात त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. यात ज्या तिरंग्यात त्याचे पार्थिव आणल्या गेले तो तिरंगा सैन्यदलाकडून सन्मानपूर्वक त्याची पत्नी बबलीच्या स्वाधीन करण्यात आला. आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगीसह नातेवाईकांनी त्याचे मुखदर्शन घेतले. धार्मिक रुढीपरंपरेनुसार विधी आटोपून त्याचा लहान भाऊ केवल दहिकर याने कैलासच्या पार्थिवाला अग्नी दिला.

अग्नीदाहपूर्वी राज्य शासनाच्यावतीने पालकमंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी, तर प्रशासनाच्यावतीने अचलपूर एसडीओ संदीपकुमार अपार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. राज्यमंत्री बच्चू कडू, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार केवलराम काळे, खासदार नवनीत राणा, जि. प. सदस्य प्रताप अभ्यंकर, बहादुर आजी-माजी सैनिक संघ, देवगावचे सरपंच गजानन येवले, सुरेखा ठाकरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सैनिक कैलासच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. मान्यवरांनी आपली जाहीर श्रद्धांजली याप्रसंगी अर्पण केली. अखेर राष्ट्रगीतासह भारत माता आणि अमर रहे। अमर रहे, वंदे मातरमच्या जयघोषाने सैनिकाला अखेरचा निरोप देण्यात आला. याप्रसंगी महिलांसह शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक राहिली.