सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी मित्रालाच लाखो रुपयांचा घातला गंडा; अमरावतीतील घटना

By प्रदीप भाकरे | Updated: May 11, 2026 20:23 IST2026-05-11T20:22:42+5:302026-05-11T20:23:18+5:30

Amravati : स्वत:चा सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी एकाने जिवाभावाच्या मित्रालाच लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.

Friend cheated of lakhs of rupees to improve CIBIL score; Incident in Amravati | सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी मित्रालाच लाखो रुपयांचा घातला गंडा; अमरावतीतील घटना

Friend cheated of lakhs of rupees to improve CIBIL score; Incident in Amravati

अमरावती : स्वत:चा सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी एकाने जिवाभावाच्या मित्रालाच लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. १९ एप्रिल २०२५ ते १० मे २०२६ दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी, विपुल भानुदास ठाकरे (जिजाऊ कॉलनी, अर्जुननगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १० मे रोजी सायंकाळी आरोपी राहुल हरिदास महाजन (३३, रा. कासमपूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी विपुुल ठाकरे आणि आरोपी राहुल महाजन हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे जुने मित्र. राहुलला व्यवसायासाठी कर्जाची गरज होती; मात्र, त्याचा सिबिल स्कोअर कमी असल्याने त्याला कर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या. याच संधीचा फायदा घेत राहुलने विपुुल यांच्याकडे एक अजब गळ घातली. तुमचे सोन्याचे दागिने माझ्या बँक खात्यात गहाण ठेवा, त्याने माझे आर्थिक व्यवहार सुधारतील, सिबिल स्कोअर वाढेल आणि मला कर्ज मिळेल, अशी बतावणी त्याने केली. मित्राच्या मदतीला धावून जाणाऱ्या विपुुल यांनी आपल्या पत्नीचे सुमारे ३११ ग्रॅमचे मंगळसूत्र, चपला हार, नेकलेस आणि चेन असे एकूण २७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने राहुलच्या स्वाधीन केले. बँकेत दागिने ठेवल्यानंतर राहुलने काही रक्कम विपुुल यांच्या पत्नीच्या खात्यात जमा केली खरी; पण, उरलेली मोठी रक्कम स्वतःसाठी वापरली.

काही काळानंतर जेव्हा विपुुल यांनी आपले दागिने सोडवून देण्याची विनंती केली, तेव्हा मात्र राहुलचा खरा चेहरा समोर आला. मी दागिने सोडवणार नाही, बँकेत येणार नाही, दागिनेही परत करणार नाही, तुला काय करायचे ते कर, अशी उघड धमकी देत त्याने विपुुल यांना हाकलून दिले. विश्वासाने दिलेले दागिने बुडाल्याचे लक्षात येताच विपुुल यांनी गाडगे नगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Web Title : अमरावती: सिबिल स्कोर सुधारने के लिए दोस्त ने ही लगाया लाखों का चूना

Web Summary : अमरावती में एक व्यक्ति ने अपने सिबिल स्कोर को सुधारने के लिए अपने ही जिगरी दोस्त को 27 लाख रुपये का चूना लगा दिया। आरोपी ने सोने के गहने उधार लिए और ऋण सुरक्षित करने का वादा किया, लेकिन इसके बजाय उसने कीमती सामान वापस करने से इनकार कर दिया और पीड़ित को धमकी दी।

Web Title : Amravati: Friend cons friend of lakhs to improve credit score.

Web Summary : In Amravati, a man defrauded his close friend of ₹27 lakhs, using the deceitful premise of improving his own CIBIL score. The accused borrowed gold jewelry, promising to secure a loan, but instead, he refused to return the valuables and threatened the victim.