शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना पाण्याचे चौपट बिल

By admin | Updated: January 14, 2017 00:14 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी बिलांचे कंत्राट दोन महिन्यांपासून खासगी कंत्राटदारांकडे सोपविले आहे.

जीवन प्राधिकरणची मनमानी : देयकांचे काम खासगी कंत्राटदाराकडे श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी बिलांचे कंत्राट दोन महिन्यांपासून खासगी कंत्राटदारांकडे सोपविले आहे. परिसरातील ग्राहकांना २० हजार रूपयांपर्यंतची बिले येत आहेत. अवाढव्य देयक भरायचे कसे या चिंतेने गोरगरीब जनता त्रस्त आहे. यामनमानी कारभाराकडे निवडणुकीच्या वर्दळीत कोणाचेही लक्ष नाही, हे विशेष. दोन ते तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे असणारे पाणी देयकांचे काम प्राधिकरणाने खासगी कंपनीकडे सोपविले आहे. तेव्हापासूनच देयकांवर मीटर रिडिंगचे छायाचित्र देखिल छापून येत आहे. जेव्हापासून बिलांचे कामकाज खासगी कंपनीकडे गेले तेव्हापासून जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांना पाण्याचे बिल अव्वाचे सव्वा येत असल्याच्या तक्रारी आहेत. ज्या ग्राहकांना अवघे पाचशे रूपये बिल येत होते त्या ग्राहकाला दोन महिन्यांपासून पाच हजार, दहा हजार ते २० हजार रुपयांपर्यंतचे देयक प्राप्त होत आहे. वाढीव बिले कमी करण्यासाठी बडनेरा शहरातील जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांना संबंधित कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. बडनेरा शहरात शेतकरी, गोरगरीब वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अवाढव्य बिले पाहून ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. मनपा निवडणुकांच्या घाईगर्दीने मात्र राजकारणी, इच्छुक उमेदवारांना यागंभीर मुद्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया त्रस्त ग्राहकांमध्ये उमटत आहेत. चौकशी करिता गेलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधिकरणचे कर्मचारी उलटसुलट माहिती देत आहेत. मीटरचे रीडिंग घेऊन येण्याच्या सूचना त्रस्त ग्राहकांना दिल्या जात आहेत. अव्वाच्या सव्वा बिलांवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील दोन वर्षांत पाण्याचे दर वाढलेले नाहीत. मग इतके बिल कसे काय, एकूणच जीवन प्राधिकरणच्या भोंगळ कारभारावर शहरवासीयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पाण्याच्या बिलांचे कंत्राट खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. बिलांवर मीटर रीडिंगचे छायाचित्रदेखील छापून येत आहे. बिले अधिक रकमेची येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. लवकरच सुरळीत बिले प्राप्त होतील. चुकीची बिले दुरूस्त केली जात आहेत. ग्राहकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता, जीवन प्राधिकरण.खासगी कंत्राटदारांकडून बडनेरा शहरात मनमानी देयके दिली जात आहे. चुकीच्या बिलांमुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. जीवन प्राधिकरणने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.- सिद्धार्थ बनसोड, सामाजिक कार्यकर्ता