शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचाऱ्यांची जंगलात पाळत

By admin | Updated: September 30, 2014 23:30 IST

दसऱ्याला पे्रम भावना व्यक्त करण्याकरिता आपट्याचे पान देण्याची प्रथा आहे. मात्र ही आपट्याची पाने जंगलातील वृक्ष तोड करुन विक्री करण्यास आणली जाते. त्यामुळे जंगलाचा ऱ्हास थांबविण्यासाठी

अमरावती : दसऱ्याला पे्रम भावना व्यक्त करण्याकरिता आपट्याचे पान देण्याची प्रथा आहे. मात्र ही आपट्याची पाने जंगलातील वृक्ष तोड करुन विक्री करण्यास आणली जाते. त्यामुळे जंगलाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वनविभाग प्रयत्न करित आहे. त्या अनुषंगाने वडाळी वनपरिक्षेत्रातील जंगलाची पाळत ठेवण्याकरिता दोन पथके सज्ज करण्यात आले आहे. दसरा सण म्हटला की सर्वांनाच सोन्याची आठवण येते. आपट्याच्या पान सोन्याचे प्रतीक म्हणून उपयोग करण्यात येते. दसऱ्यात प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येक जण आपट्याचे पान दुसऱ्याला भेट देऊन प्रेमभावना व्यक्त करतात. मात्र हे आपट्याचे पान कोठून आणल्या जाते व कसे आणल्या जाते. याकडे कोणीही लक्ष देत नाहीत. आपट्याचे वृक्ष गेल्या काही वर्षात दुर्मिळ होत चालले आहे. अमरावती शहराजवळील जंगलात आमट्याच्या वृक्षांचे संवर्धन वनविभागाकडून करण्यात आले आहे. मात्र दरवर्षी दसऱ्यानिमित्त अनेक जण आपट्याच्या पानाची विक्री करण्याच्या बेतात जंगलातील आपट्याचे वृक्ष तोड करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जंगलातील आपट्याचे वृक्ष दुर्मिळ होताना दिसून येत आहे. त्या अनुषंगाने यंदा वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी. के. लाकडे यांनी वन कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार केली आहे. प्रत्येक पथकात दोन वनपाल, चार वनरक्षक व दोन वन मजुरांचा सहभाग राहणार आहे.