शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लाकुड डेपोच्या जमिनीकडे वनअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

पान ३ ची लिड कुठे अतिक्रमण, तर कुठे शेती, रेकॉर्डचीही वानवा अनिल कडू परतवाडा : मेळघाटातील सागवान लाकडाचा लिलाव ...

पान ३ ची लिड

कुठे अतिक्रमण, तर कुठे शेती, रेकॉर्डचीही वानवा

अनिल कडू

परतवाडा : मेळघाटातील सागवान लाकडाचा लिलाव पद्धतीने विक्री करून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या लाकूड डेपोच्या जमिनीकडे वनविभागासह वनअधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. यात जमिनींवर कुठे अतिक्रमण, तर कुठे शेती केली जात आहे. काही प्रकरणांत महसूल विभाग त्यांच्याकडून जमिनी हिसकावून घेत आहे.

सर्वात जुना शासकीय लाकूड डेपो परतवाडा येथे आहे. या डेपोला एक इतिहास आहे. या डेपोतील लाकूड ठेवण्याकरिता असलेला एक नझूल प्लॉट आहे. ही जमीन नझूलने वनविभागाला दिली आहे. लिजवरील या जमीनीला महत्त्वपूर्ण दस्तऐवज आज वनविभागाकडे नाही. नझूल प्लॉटवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. काहींनी पक्की स्लॅबची घरे बांधली आहेत आणि हे सर्व वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत झाले आहे. दरम्यान परतवाडा लाकूड डेपो ऑफिसरने ३१ लोकांना अतिक्रमणाच्या कारणावरून नोटीस दिल्यात. नझूल विभागाकडे पत्रव्यवहार केला. नझूल विभागाने नकाशाची एक प्रतही काढून दिली. अतिक्रमण किती, नाला किती आणि वनविभागाच्या ताब्यात किती क्षेत्र आहे, याची माहिती काढून दिली. अतिक्रमण कर्त्याकडे अचलपूर नगरपालीकेच्या घरटॅक्स पावत्या आहेत. इलेक्ट्रिक बिलाच्या पावत्याही आहेत. जवळ-जवळ हे अतिक्रमण १९९६ पासून असल्याचे बोलले जात आहे. या अतिक्रमणाच्या अनुषंगाने जमिनीबाबतच्या माहितीचे महत्त्वपूर्ण आवश्यक दस्तऐवज नझुल विभागाने डेपो ऑफिसरला मागितले. पण तो दस्तावेज वनविभग नझूलकडे सादर करू शकला नाही.

बॉक्स १

महसूलने हिसकावली जमीन

परतवाडा लाकूड डेपोकडे लाकूड रस्त्याला लागून परतवाडा गट क्रमांक २५ अंतर्गत ३.९९ हेक्टर जमीन दिली गेली. वनविभागाच्या ताब्यात आणि लाकडे त्या जमिनीवर असताना महसूल विभागाने यातील १.२१ हेक्टर जमीन चक्क हिसकावून घेतली आणि ती १.२१ हेक्टर जमीन गोपाल येवले नामक एका खासगी व्यक्तीला दिली. आता या जमिनीवर तो खासगी व्यक्ती शेती करीत आहे.

बॉक्स

लाकुड डेपोची मोजणी केव्हा?

ऑक्टोबर २०२० मध्ये मेळघाट (प्रादेशिक) वनविभागाच्या उपवनसंरक्षकपदी एक महिला अधिकारी रुजू झाल्यात. त्यांनी आरएफओ आणि अ‍ेसीएफच्या घेतलेल्या मासिक सभेत सर्व्हे अंतर्गत अनुक्रमांक ११ वर मौजा परतवाडा येथील वनविभागाचे ताब्यात असलेल्या आगार (लाकूड डेपो) क्षेत्राची मोजणी करण्याबाबत विषय घेतला. आगार अधिकारी (डेपोऑफीसर) या सभेला हजर होते. पण हा महत्त्वपूर्ण विषय चर्चेपूरताच राहिला. मोजणी करण्यात आलेली नाही.