शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधी शेतकरी राजकारण्यांच्या कर्जमाफीच्या घोषणांना भुल्ले आणि आता व्याजमाफीलाही मुकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:00 IST

Amravati : मार्चअखेर पीक कर्जाचा भरणा नसल्याने हजारो शेतकऱ्यांना फटका

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजकारणातील घोषणांच्या आतषबाजीत शेतकऱ्यांची फसगत होत आहे. कर्जमाफी होणार असल्याच्या चर्चेने जिल्हा बँकेच्या १३ हजार नियमित खातेदारांनी ३१ मार्चच्या आत पीक कर्जाचा भरणा न केल्याने त्यांना शून्य टक्के व्याजमाफीला मुकावे लागले. आता ३० जूनपर्यंत ८.७५ टक्के व त्यानंतर थकबाकीदार राहिल्यास ११.७५ टक्के व्याजाचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे वास्तव आहे.

गतवर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारा उच्चांकी ५५ हजार ३४२ शेतकऱ्यांना ६४७.३० कोटींच्या खरीप पीक कर्जाचे वाटप केले. हे वाटप सरासरीच्या १०४ टक्के होते. प्रत्यक्षात जिल्हा बँकेला ६२० कोटींच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक होता. त्या तुलनेत २७.३० कोटींचे जास्त कर्जवाटप करण्यात आले. त्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी व नियमित खातेदारांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिल्याने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला व कर्जवाटपाचा टक्का वाढला होता. 

त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महाविकास आघाडीद्वारे कर्जमाफीची घोषणा केली व त्याला प्रत्युत्तर देत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनीही कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आल्याने कर्जमाफी द्यावी, यासाठी विविध पक्षांद्वारा आंदोलने होत आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफी होणार, या आशेमुळे हजारो शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे हे शेतकरी शून्य टक्के व्याजमाफीला मुकले आहेत.

११.७५ टक्के व्याजाचा भुर्दंड ३० जूनपूर्वी पीक कर्जाचा भरणा न केल्यास खातेदारांना बसणार आहे. १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ खातेदारांना मिळेल.

थकीत कर्जानी वाढला बँकांचा एनपीएजिल्हा बँकेसोबत राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही हीच परिस्थिती असल्याने थकीत कर्जाचा आकडा फुगत चालला आहे व यामुळे बँकांची आर्थिक कोंडी होत आहे. शिवाय 'एनपीए' देखील वाढत असल्याची वस्तुस्थिती आहे. बँकांचे खातेदार थकबाकीदार असल्याने यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाची गती मंदावणार आहे.

३० जूनपर्यंत व्याजात ३ टक्के सवलत३१ मार्चपर्यंत पीक कर्जाचा भरणा केल्यास शून्य टक्के व्याज सवलत मिळते. त्यानंतर १ एप्रिल ते ३० जून दरम्यान ८.७५ टक्के व्याजाची आकारणी होईल. यामध्ये व्याज सवलत योजनेच्या ३ टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळतो. त्यानंतर मात्र ११.७५ टक्के व्याजाची आकारणी होते.

जिल्हा बँकेची कर्ज मागणी (लाखात)सभासद खातेदार (चालू) - ५५४१०खातेदारांची रक्कम - ६४७१४थकबाकी खातेदार - ४९३९६थकबाकी रक्कम - ३५४९८.६८

कर्जवसुली (लाखात/३१ मार्च)सभासद खातेदार (चालू) : ४२३८५खातेदारांची रक्कम : ४९५७४.३८थकबाकी खातेदार : ९०५थकबाकी रक्कम : २८४२.०२

"नियमित खातेदारांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा न केल्याने त्यांना शून्य टक्के व्याजमाफीपासून वंचित राहावे लागले. आता १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत ८.७५ टक्क्यांनी व्याज आकारणी होईल."- शंकर कुंभार, जिल्हा उपनिबंधक

"नियमित खातेदारांना पुन्हा एक संधी आहे. त्यांनी ३० जूनपूर्वी कर्जाचा भरणा केल्यास ३ टक्के व्याजाची सवलत मिळेल. त्यानंतर थकीत कर्जावर ११.७५ टक्के व्याजाची आकारणी होईल."- अभिजीत ढेपे, उपाध्यक्ष, जिल्हा बँक

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीfarmingशेती