शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उपमहापौर शेख जफर जेरबंद

By admin | Updated: September 24, 2015 00:28 IST

तडीपार असतानाही शहरात आढळून आलेला आरोपी उपमहापौर शेख जफर शेख जब्बार याला बुधवारी शहर कोतवाली पोलिसांनी नमुना परिसरातून अटक केली.

तडीपार प्रकरण : मनाईहुकूम झुगारून शहरातचअमरावती : तडीपार असतानाही शहरात आढळून आलेला आरोपी उपमहापौर शेख जफर शेख जब्बार याला बुधवारी शहर कोतवाली पोलिसांनी नमुना परिसरातून अटक केली. शेख जफरला खंडणी प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. उपमहापौर शेख जफर दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार करून त्याला अकोला शहर देण्यात आले होते. दरम्यान शेख जफरने नमुना येथील निवासस्थानी हेमंत व्यास व त्यांचा मुलगा प्रशांत व्यास यांना पाच तास डांबून ५ कोटी २८ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणात शहर कोतवाली पोलिसांनी शेख जफरसह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.सीपीने घेतली परेडजफरला अटक करून गाडगेनगर ठाण्यात नेल्यावर पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी त्यांची चांगलीच परेड घेतली. तेथे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे सुध्दा पोहचले. त्यांनी शेख जफरची कसून चौकशी केली. यावेळी शेख जफरच्या समर्थकांची ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमली होती. आतापर्यंत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून शेख जफरच्या शोध सुरू होता. मात्र, त्याने अटकपूर्व जामीन मिळविला आहे. मात्र बुधवारी जफर विना परवानगीने अमरावतीत दाखल झाला होता. सायंकाळी ५.४० वाजताच्या सुमारास शहर कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी अमोल खंडेझोड, अक्षय देशमुख व विजय पेठे दुचाकीने नमुना परिसरात गस्त घालत होते. दरम्यान त्यांनी शेख जफरला घरून ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार शेख जफर बकरी ईदनिमित्त घरी परत आला होता. अटक केल्यानंतर शेख जफरने पोलिसांना अटक न करण्याची विनवणी केली. मात्र, ठाणेदार दिलीप पाटील यांनी जफरला दुचाकीवर बसवून ठाण्यात आणले. या घटनेची माहिती पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांना दिली. तेंव्हा पोलीस आयुक्तांनी ठाणेदार पाटील यांना जफरला गाडगेनगर ठाण्यात आणण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गाडगेनगर पोलीस ठाण्यात शेख जफरची पोलीस आयुक्तांनी पुढील चौकशी चालविली होती.