शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांसाठी राज्यस्तरावर लढा उभारणार

By admin | Updated: October 11, 2016 00:22 IST

मागील तीन वर्षे आपण राज्यभरातील दिव्यांगांसाठी लढा उभारला. केंद्र शासनापर्यंत आवाज बुलंद करीत २१ पेक्षा अधिक शासन निर्णय तयार करण्याचा इतिहास झाला.

बच्चू कडू : महिनाभरात हमाल, मापारी कामगार कायदा लागू करा परतवाडा : मागील तीन वर्षे आपण राज्यभरातील दिव्यांगांसाठी लढा उभारला. केंद्र शासनापर्यंत आवाज बुलंद करीत २१ पेक्षा अधिक शासन निर्णय तयार करण्याचा इतिहास झाला. त्याच धर्तीवर आता राज्यभरातील विविध क्षेत्र, कंपन्या, बाजार समिती, गवंडी बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी सतत दोन वर्षे राज्यभर न्यायासह कायदा लागू करण्यासाठी आंदोलने उभारण्यात येणार असल्याची माहिती अचलपूरचे आ. बच्चू कडू यांनी खास ‘लोकमत’च्या विशेष मुलाखतीत दिली. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत हमाल, मापारी, रोजंदारी कामगारांना एका महिन्यात माथाडी कामगार कायदा लागू करण्याचा इशारा देत राज्यभरातील पहिल्या कामगार न्याय आंदोलनाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी आपण अपंगांसाठी अनेक आंदोलने उभारलीत, राज्यभर ही आंदोलने गाजली, २१ पेक्षा अधिक कायदे राज्य आणि केंद्र शासनाने बनविले त्याचा फायदा राज्यभरातील ४५ लक्ष पेक्षा अधिक अपंगांना झाला. दीडशे कोटींची तरतूद झाली. अनुसूचित जाती, जमाती व आदिवासी समाजातील अंध, अपंगांना ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिकेमध्ये तीन टक्के घरकुलचा स्पेशल कोटा मंजूर करण्यात आले असल्याचे आ. बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)आवाज दडपण्याचा प्रयत्नराज्यभरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी कामगारांच्या समस्या सर्वाधिक प्रमाणात आहेत. वर्षानुवर्षे रात्रंदिवस काम करून सुद्धा वेठबिगारीचे वेतन देवून त्यांचे शोषण केल्या जात आहे. खासगी आणि सहकार क्षेत्र, विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा प्रश्न गंभीर आहे. तोच प्रश्न गवंडी काम करणाऱ्या मजुरांचा आहे. वर्षानुवर्षे त्यांचे शोषण केल्या जात आहे. त्यांचे आवाज दाबण्याचा सतत प्रयत्न केला जातो. शासनाचे ढीगभर कायदे पायदळी तुडवित त्यांना कवडीचा लाभ दिला जात नाही. मग या क्षेत्राचा अभ्यास करून राज्यभरातील कामगारांचा लढा उभारण्याचा निर्णय आपण घेतल्याचे आ. बच्चू कडू म्हणाले. गवंड्यांवर सुद्धा लक्षराज्यभरातील बाजार समित्यासह इतर क्षेत्रात माथाडी कामगार कायदा लागू करण्याचा शुभारंभ शुक्रवारी अचलपूर बाजार समितीमधून करण्यात आला. त्यामध्ये गवंडी बांधकाम करणाऱ्या मजुरांना सुद्धा कायद्यानुसार लाभ मिळवून देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. कामाच्या वेळा निश्चित करणे, वेतन, सुटी, आरोग्याचा प्रश्न, भविष्य निर्वाह निधी आदी सर्व बारीक बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत घरेलू कामगारांना कुठेच न्याय मिळाला नाही. कायद्यात बदल करण्याची गरज वाटल्यास त्यासाठी सुद्धा मागेपुढे पाहणार नाही. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या या राज्यात पुढीलदोन वर्षे कामगारांसाठी असल्याचे सांगून आ. बच्चू कडूने अचलपूर या आपल्याच मतदारसंघातून रणशिंग फुंकले.