शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीच्या निर्माल्यापासून बनणार खत

By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST

सध्या शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. हजारोंच्या संख्येने गणपतींची स्थापना करण्यात आली आहे.

पुढाकार : आदर्श शिक्षिका रजनी आमले यांचा पुढाकार, विसर्जनस्थळी गोळा केले जाते निर्माल्य लोकमत शुभवर्तमानअमरावती : सध्या शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. हजारोंच्या संख्येने गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. दररोज या गणपतींना हार, फुले, दुर्वा नेमाने वाहण्यात येतात. मात्र, गणपतीला श्रद्धापूर्वक वाहिले गेलेला दुर्वा आणि फुलांचे पुढे निर्माल्य होते. तसेच यामुळे प्रदूषणात भर पडते. ही बाब हेरून एका शिक्षिकेने निर्माल्यापासून खत बनविण्याची शक्कल लढविली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी नदीकाठी उभे राहून त्या निर्माल्य संकलन करतात. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदर्श पुरस्काराने पुरस्कृत सहायक शिक्षिका रजनी आमले या मागील सात ते आठ वर्षांपासून निर्माल्यापासून खत बनविणऱ्या प्रकल्पावर काम करीत आहेत. रजनी आमले यांनी सांगितले की, त्या गेल्या अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने गणेशाच्या मूर्तीवरून निघालेले निर्माल्य एकत्रित करतात. त्यापासून त्या खत तयार करतात. गणेशोत्सव मंडळांजवळ त्या निर्माल्य संकलनासाठी एक पोते ठेवतात. त्यात निर्माल्यासह मूर्तीवर वाहिली जाणारी सामग्री संकलित करतात. सण इको फ्रेंडली पद्धतीने साजरे करण्यावर रजनी आमले यांचा भर आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश जावा, या उद्देशाने रजनी आमले हा उपक्रम राबवीत आहेत. (प्रतिनिधी)खत तयार करण्याची प्रक्रियारजनी आमले या अनेक वर्षांपासून घरगुती गणपती तसेच गणेशोत्सव मंडळ आणि नदीच्या काठावर उभे राहून निर्माल्य संकलित करतात. त्यानंतर त्यातून फूल, बेल आणि हार वेगळे करतात. त्यानंतर हे निर्माल्य शाळेच्या बगिच्यात खोल खड्डा करून पुरले जातात. दोन दिवस यात शेण टाकून ते कुजविले जाते. त्यानंतर मातीने ते झाकून ठेवण्यात येते. वर्षभरानंतर हे खत काढून पुन्हा हीच प्रक्रिया केली जाते. शाळेमध्येच वापररजनी आमले यांनी सांगितले की, वर्षभरात हे खत तयार होत असले तरी मध्ये हे खत काढून त्याचा उपयोग शाळेच्या बगिचासाठी केला जातो. यातून विद्यार्थ्यांना ज्ञान तर मिळतेच. पण, त्यांच्यामध्ये पर्यावरणविषयक जागरूकताही निर्माण होते. भारतीय चलनाचा अपव्यय अनेक गणेशोत्स्व मंडळांद्वारे विड्याखाली ठेवले जाणारे पैसेदेखील नदीमध्ये विसर्जित केले जातात. यामुळे भारतीय चलनाचा अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी रजनी आमले यांनी गणेशोत्सव मंडळांना विड्याखाली ठेवलेली सुपारी आणि पैसे निर्माल्यासमवेत टाकण्याचे आवाहन रजनी आमले यांनी केले आहे.