शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा डेंग्यूच्या उद्रेकाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:01 IST

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या सुरुवातीच्या काळात स्वच्छतेची गाडी रुळावर आली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात परिस्थिती ‘जैसे थै’ झालेली आहे. कुणाचाही वचक या विभागावर नसल्याने कंत्राटदारांचे फावले आहे. आयुक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये व्यस्त आहेत; उपायुक्तांना याविषयी काहीच सोयरसुतक नाही, अशी स्थिती असल्याने या विभागात मनमानी कारभार सुरु आहे.

ठळक मुद्देस्वच्छता कुठे? : ओला- सुका कचरा एकत्रच, चार दिवसाआड होते संकलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात कोरोनाचे संकट दिवसेन्दिवस गडद होत असताना पावसाळ्यापूर्वी सफाई न झाल्याने ठिकठिकाणी नाल्या तुंबल्या आहेत. अनेक भागांमध्ये डबकी साचली. येथून आता डेंग्यूचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे. ओला-सुका कचरा एकत्र असल्याने पर्यावरणाच्या मानकांचे उल्लंघन होत आहे. यावर ताण म्हणजे, दैनंदिन स्वच्छतेऐवजी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी कचºयाचे संकलन होत आहे. यामुळे महापालिका क्षेत्रात स्वच्छतेची वाट लागली आहे.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या सुरुवातीच्या काळात स्वच्छतेची गाडी रुळावर आली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात परिस्थिती ‘जैसे थै’ झालेली आहे. कुणाचाही वचक या विभागावर नसल्याने कंत्राटदारांचे फावले आहे. आयुक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये व्यस्त आहेत; उपायुक्तांना याविषयी काहीच सोयरसुतक नाही, अशी स्थिती असल्याने या विभागात मनमानी कारभार सुरु आहे. बडनेरा प्रभागात वैयक्तिक शौचालय प्रकरणात रोज नवनवीन प्रकार बाहेर येत असल्याने महापालिका प्रशासन कसे चालते, हे जगजाहीर झाले. या प्रकरणात दोन एफआयआर झाले. आता समितीचा अहवाल आल्यानंतर विभागात पाणी कुठवर मुरले, ते बाहेर येणार आहे.महापालिका क्षेत्रातील २२ प्रभाग अन् तीन बाजारांसाठी कंत्राटदार निश्चित झाले. मात्र, त्यांच्याकडून दैनंदिन कचरा संकलन होतो की नाही, यावर कुणाचेच नियंत्रण नाही. कोरोना प्रादुर्भावाचे काळात एप्रिल-मे महिन्यात सर्व काही ठीकठाक होते. जसजशी रुग्णसंख्या वाढली, प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये गुंतले, या बाबीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. कंत्राटादारांच्या मनमानी कारभाराला आवरणार कोण, असा सवाल आहे.कोरोनाच्या संकटात डासांचे आगारबहुतेक भागांतील नाल्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ झाल्या नसल्याने तुंबलेल्या आहे. अनेक भागांत डबकी साचली आहेत. त्यामुळे डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होत असल्याने आता कोरोना संकटात डेंग्यूच्या उदे्रकाची भीती निर्माण झालेली आहे. या डबक्यात ‘एमएलओ’ आॅईल टाकले जात नाही. महापालिका प्रशासन झोपेत असल्याने कंत्राटदार याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत आहेत. महापालिकेचे ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, अन्य कर्मचारी करतात तरी काय, असा अमरावतीकरांचा सवाल आहे.फॉगिंग कुठे? फक्त फोटो सेशनप्रत्येक कंत्राटदाराकडे पाच फॉगिंग मशीन असणे अनिवार्य आहे. मात्र, त्या फक्त कागदावरच ही स्थिती आहे. कुठल्याही भागात फॉगिंग केले जात नाही. अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान फक्त फोटो सेशन केले जाते. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कधीच हा प्रकार होत नाही. कोरोनाकाळात तर सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळेला फॉगिंग करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. यंत्रणेला याचा विसर पडला असून, एकाही नगरसेवकाने याबाबत विचारणा केलेली नाही, हे विशेष.

टॅग्स :dengueडेंग्यू