जनसमस्या सोडविण्यासाठी सातरगावात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:31+5:302021-02-05T05:29:31+5:30

प्रदीप बोरकर यांनी मांडल्या गावच्या समस्या नांदगाव खंडेश्वर : गावाच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सातरगाव येथील प्रदीप बोरकर यांनी ...

Fasting in Satargaon to solve people's problems | जनसमस्या सोडविण्यासाठी सातरगावात उपोषण

जनसमस्या सोडविण्यासाठी सातरगावात उपोषण

प्रदीप बोरकर यांनी मांडल्या गावच्या समस्या

नांदगाव खंडेश्वर : गावाच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सातरगाव येथील प्रदीप बोरकर यांनी प्रजासत्ताक दिनापासून गावात उपोषण सुरू केले आहे. या मागण्यांसाठी गावातील विविध स्तरातून पाठिंबादेखील मिळाला आहे.

सातरगाव येथील पूर्व माध्यमिक शाळा वर्ग १ ते ७ च्या खोल्यांचे बांधकाम पूर्ण करा. सातरगाव ते नांदगाव खंडेश्वर तसेच दिघी, मोखड या रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे बांधकाम. सातरगाव ते सावनेर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करा. सातरगाव येथील ग्रामपंचायत भवन बांधकाम व शेतशिवारातील पांदण रस्ते तयार करा. गावातील गोवारी, ओबीसी, मागासवर्गीय कुटुंबांना घरकुलाचा लाभ घ्या या मागण्यांचा समावेश आहे.

गेल्या चार वर्षांपासून प्रदीप बोरकर हे सातत्याने या समस्या मांडत असून मागील वर्षीही त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. त्यावेळी त्यांना समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आल्याने उपोषण मागे घेतले होते. पण एक वर्षाचा कालावधी उलटूनही या समस्या सोडविण्यात न आल्याने त्यांनी पुन्हा उपोषणचा मार्ग अवलंबिला आहे.

Web Title: Fasting in Satargaon to solve people's problems