शेतकर्‍याचे पावणे दोन लाख लांबविले

By Admin | Updated: May 22, 2014 00:33 IST2014-05-22T00:31:38+5:302014-05-22T00:33:31+5:30

परभणी : तुमच्या अंगावर घाण पडली आहे, कपडे काढून स्वच्छ धुवा, असे सांगून एका व्यक्तीचे एक लाख ७४ हजार रुपये लांबविल्याची घटना २१ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.

The farmer's livelihood has increased by two lakh | शेतकर्‍याचे पावणे दोन लाख लांबविले

शेतकर्‍याचे पावणे दोन लाख लांबविले

परभणी : तुमच्या अंगावर घाण पडली आहे, कपडे काढून स्वच्छ धुवा, असे सांगून एका व्यक्तीचे एक लाख ७४ हजार रुपये लांबविल्याची घटना २१ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे. परभणी शहरापासून काही अंतरावर असलेल्या राहटी येथील ज्ञानेश्वर डिगंबरराव खुळे हे २१ मे रोजी परभणी शहरात आले होते. शहरातील नवा मोंढा भागातील हैदराबाद बँकेच्या कृषी शाखेतून त्यांनी एक लाख ७४ हजार रुपयांची रक्कम स्वत:च्या खात्यातून काढली. ही रक्कम एका काळ्या पिशवीमध्ये ठेवली. गावाकडे जाण्यापूर्वी शहरातील ओस्तवाल कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे खाजगी काम होते. त्यामुळे नवा मोंढा भागातून ते ओस्तवाल कॉम्प्लेक्स येथे आले. या ठिकाणी कॉम्प्लेक्सच्या पायर्‍या चढून वर जात असताना समोरुन येणार्‍या एका व्यक्तीने त्यांना तुमच्या अंगावर घाण पडली आहे, असे सांगितले. त्यावर ज्ञानेश्वर खुळे यांनी राहु द्या, घरी गेल्यावर धुणार आहे. परंतु, समोरच्या व्यक्तीने कपडे काढण्यास सांगून घाण स्वच्छ करण्याचा आग्रह केला. त्यामुळे ज्ञानेश्वर यांनी शर्ट काढले आणि कॉम्प्लेक्सच्या खाली असलेल्या हौदाजवळ शर्ट पाण्याने धुतले. या दरम्यान, त्यांनी हातातील पैशाची पिशवी गाडीच्या हॅन्डलला लटकविली. शर्ट धुणे होईपर्यंत या पिशवीतील १ लाख ७४ हजार रुपये गायब झाल्याचे खुळे यांच्या लक्षात आले. लगेच त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती नवा मोंढा पोलिस ठाण्यातून मिळाली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. (प्रतिनिधी)

Web Title: The farmer's livelihood has increased by two lakh