शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेल खणू न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 20:37 IST

गुन्हे दाखल केल्यानंतर शेतकऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अमरावती: खोडगाव शिवारात असलेल्या स्वमालकीच्या शेतीत बोअरवेल करण्यास मज्जाव करण्यात आल्याने एका शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन केले. उपचारादरम्यान त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल होईपर्यंत मृतदेह न उचलण्याचा पवित्रा घेण्यात आला. सरतेशेवटी पाच जणांविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. संतोष कपले (३५, पानअटाई, गुलजारपुरा, अंजनगाव सुर्जी) असे मृताचे नाव आहे.याप्रकरणी मृताची पत्नी नीता संतोष कपले यांच्या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी शनिवारी सुभाष थोरात, रतन थोरात, रवन थोरात, शुभम थोरात व महादेव भावे (सर्व रा. अंजनगाव सुर्जी) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कपले यांची खोडगाव शिवारात दोन एकर शेती आहे. त्यांच्या शेजारच्या शेताचा ताबा सुभाष व रतन थोरात या भावांकडे आहे. कपले यांना ओलितासाठी बोअर खणायची होती. मात्र, आपल्या शेतातील पाणी कमी होईल, असे कारण सांगत थोरात यांनी विरोध केला. तक्रारीनुसार, आठ दिवसांपूर्वी आरोपींनी संतोष व नीता कपले यांना शिवीगाळ व मारहाण केली. तो अपमान सहन न झाल्याने संतोष कपले यांनी १९ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास विष प्राशन केले. त्यांना तातडीने अंजनगाव, अचलपूर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, २० मार्च रोजी रात्री ८.३० च्या सुमारास संतोष कपले यांचा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेथेच शवविच्छेदन झाल्यानंतर तो मृतदेह शनिवारी दुपारी थेट अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात आणण्यात आला. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करून अंत्यसंस्कारास नकार देण्यात आला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. अखेरीस मृताची पत्नी नीता कपले यांची जबानी नोंदवून पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी संतोष कपले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याfarmer suicideशेतकरी आत्महत्या